Kidnapped and robbed four students; An acquaintance was released after meeting him | चार विद्यार्थ्यांचे अपहरण करून लूटले; ओळखीचा मित्र भेटल्याने झाली सुटका

चार विद्यार्थ्यांचे अपहरण करून लूटले; ओळखीचा मित्र भेटल्याने झाली सुटका

ठळक मुद्देगुरुवाणी लेआऊट वाघापूर येथे राहणारा इयत्ता ११वी सायन्सचा विद्यार्थी कोल्हे लेआऊट येथील कोचिंग क्लासेसमध्ये आहे.

यवतमाळ : शिकवणी वर्गासाठी घराबाहेर पडलेल्या चार मित्रमैत्रीणींचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करीत लूटले. इतकेच नव्हे तर मुलींचा विनयभंगही केला. हा थरारक प्रकार सोमवारी दुपारी घडला. कशीबशी सुटका झाल्यानंतर त्या चार विद्यार्थ्यांनी आपबीती कथन केली. अवधुतवाडी पोलीसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गुरुवाणी लेआऊट वाघापूर येथे राहणारा इयत्ता ११वी सायन्सचा विद्यार्थी कोल्हे लेआऊट येथील कोचिंग क्लासेसमध्ये आहे. तो दुपारी दीड वाजता एक मित्र व दोन मैत्रीणींसह लोहारा एमआयडीसी परिसरात रस्त्यावर उभा होता. त्याचवेळी एम.एच. 31 बी.टी. 6333 क्रमांकाच्या दुचाकीवरून चारजण आले. त्यांनी हातातील काठीने दोघांना मारहाण करीत त्यांच्या दुचाकीची जावी व मोबाईल हिसकावून घेतले. त्यानंतर रस्त्यालगतच्या झुडपी जंगलात नेवून काठीने मारहाण सुरू केली. दोन मुलींना काही अंतरावर दाट झुडपात नेवून त्यांची छेडछाड केली. हा प्रकार सुरू असतानाच काही ओळखीचे मित्र तेथे आले त्यांना आपबीती सांगताच त्या चारही आरोपींनी घटनास्थळी दुचाकी टाकूण पळ काढला. त्या अज्ञात आरोपींनी मोबाईल व इतर असा मिळून ३५ हजाराचा मुद्देमाल लुटून नेला. या गंभीर घटनेची अवधूतवाडी पोलीसांनी नोंद घेतली असून अज्ञात चौघांविरोधात भादवी कलम ३९४, ३६३, ३४१, ३५४(अ), ३२३, ५०६, ३४ आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम २०१२ यातील सहकलम ८,१२ नुसार गुन्हा दाखल केला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल गुहे करीत आहेत.

Web Title: Kidnapped and robbed four students; An acquaintance was released after meeting him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.