Ramachandra Rao : अश्लील Video व्हायरल झाल्याने कर्नाटकचे डीजीपी रामचंद्र राव निलंबित; लेकीलाही झालीय अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 08:49 IST2026-01-20T08:49:12+5:302026-01-20T08:49:54+5:30

Ramachandra Rao : कर्नाटकचे डीजीपी आणि वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी रामचंद्र राव यांना निलंबित करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

karnataka dgp viral video ips Ramachandra Rao suspended cm siddaramaiah | Ramachandra Rao : अश्लील Video व्हायरल झाल्याने कर्नाटकचे डीजीपी रामचंद्र राव निलंबित; लेकीलाही झालीय अटक

फोटो - आजतक

कर्नाटकचे डीजीपी आणि वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी रामचंद्र राव यांना निलंबित करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. रामचंद्र राव हे कर्नाटकात डीजीपी या पदावर कार्यरत होते. सोमवारी सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्या, ज्यामध्ये रामचंद्र राव वेगवेगळ्या महिलांसोबत अश्लील कृत्य करताना दिसत होते.

व्हिडीओ समोर येताच प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने तातडीने राव यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, रामचंद्र राव यांनी हे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. हे व्हिडीओ पूर्णपणे बनावट आणि खोटे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सध्या याची जोरदार चर्चा रंगली आहे. 

कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्या घराबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना राव म्हणाले, मला या प्रकारामुळे मोठा धक्का बसला आहे. माझा व्हिडीओशी कोणताही संबंध नाही. आजच्या काळात कोणाचाही बनावट व्हिडीओ तयार केला जाऊ शकतो आणि हा आपली प्रतिमा मलिन करण्याचा कट असू शकतो, असंही त्यांनी नमूद केलं.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राव यांनी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची भेट होऊ शकली नाही. सरकारने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे संकेत दिले असून, चौकशी अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. रामचंद्र राव यांची मुलगी रान्या रावला या आधी सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. 

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. हा वाद गांभीर्याने घेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कडक कारवाईचे आश्वासन दिलं आहे. "आम्ही या प्रकरणाची चौकशी करू. मला  याची माहिती मिळाली. व्यक्ती कोणत्याही पदावर असली तरी कायदा सर्वांसाठी समान आहे. आम्ही चौकशी करू आणि त्यानंतरच पुढील पावले उचलली जातील" असं म्हटलं आहे.

Web Title : अश्लील वीडियो वायरल होने पर कर्नाटक के डीजीपी निलंबित; बेटी भी गिरफ्तार

Web Summary : कर्नाटक के डीजीपी रामचंद्र राव को अश्लील वीडियो सामने आने के बाद निलंबित कर दिया गया। उन्होंने आरोपों से इनकार किया है और वीडियो को फर्जी बताया है। उनकी बेटी पहले सोने की तस्करी के मामले में गिरफ्तार हो चुकी है। जांच के आदेश दिए गए हैं।

Web Title : Karnataka DGP Suspended After Obscene Video Goes Viral; Daughter Also Arrested

Web Summary : Karnataka DGP Ramachandra Rao suspended after an alleged obscene video surfaced. He denies the claims, calling the video fake. His daughter was previously arrested in a gold smuggling case. An investigation has been ordered.