शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

Jitendra awhad : 'जितेंद्र आव्हाड, तुझा दाभोलकर होणार' धमकी मिळाल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 14:30 IST

Jitendra awhad News : राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट असताना आव्हाड यांच्यासमोर झालेल्या मारहाण प्रकरणावरून राजकीय वातावरणही पेटू लागलं आहे.

ठळक मुद्देजितेंद्र आव्हाड, तुझा दाभोलकर होणार, तरुणाने फेसबुकवरून दिली धमकीजितेंद्र आव्हाड यांच्यासमोर आपल्याला बेदम मारहाण झाल्याचा आरोप ठाण्यातील  एका इंजिनिअर तरुणाने केला होता.या मारहाण प्रकरणावरून सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत

मुंबई - राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते जितेंद्र आव्हाड एका मारहाणीच्या प्रकरणामुळे अडचणीत आले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केल्याने आपल्याला त्यांच्या समक्ष मारहाण करण्यात आल्याचा आरोप ठाण्यातील एक तरुणाने केला होता. दरम्यान, आज एका तरुणाने जितेंद्र आव्हाड, तुझा दाभोलकर होणार अशी धमकी फेसबुकवरून दिल्याने खळबळ उडाली आहे. 

जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर आपल्याला बेदम मारहाण झाल्याचा आरोप ठाण्यातील  एका इंजिनिअर तरुणाने केला होता. त्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. या मारहाण प्रकरणावरून सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचदरम्यान एका तरुणाने फेसबुकवरील एका पोस्टखाली प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड तुझा दाभोलकर होणार' अशा शब्दांत धमकी दिली आहे.

दरम्यान, ठाण्यातील त्या तरुणाला झालेल्या मारहाणीप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत जितेंद्र आव्हाड म्हणाले की,  माझ्या विरोधात गेली 3 वर्षे हा अभियंता नको नको त्या पोस्ट करतो आहे. मला माझे कार्यकर्ते याबाबत अनेकदा सांगायचे पण मी याकडे दुर्लक्ष केले. मी गेले २४ तास माझ्या मतदारसंघात आणि सोलापूर जिल्हयातील कामात व्यस्त आहे. या अभियंत्याला मारहाण झाल्याचा सर्व प्रकार मला सोशल मीडियाद्वारे समजला, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट असताना आव्हाड यांच्या मारहाण प्रकरणावरून राजकीय वातावरणही पेटू लागलं आहे. मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहे.  लॉकडाऊनच्या काळातही खुद्द तरुणाला मंत्र्यांच्या बंगल्यात बोलावून ही मारहाण झाल्याने विरोधकांनी सरकारवरच निशाणा साधला आहे. भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तात्काळ बडतर्फ करा अशी मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. मोदी यांनी हे आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या भूमिकेवर सडकून टीका केली होती. आव्हाड यांनी आपली भूमिका ट्वीट करून प्रसिद्धही केली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर ठाण्यातील संबंधित तरुणाने आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी या तरुणाला जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडCrime Newsगुन्हेगारीNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणFacebookफेसबुकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस