प्रेयसीला धोका देणे हा गुन्हा ठरू शकत नाही - हायकोर्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 11:14 AM2019-10-11T11:14:37+5:302019-10-11T11:14:42+5:30

प्रेमाच्या आणाभाका घेऊन, विवाहाचे अमिष दाखवून नंतर प्रेयसीला धोका देण्याचे प्रमाण गेल्या काही काळा वाढले आहे.

infidelity against girlfriend is not a crime - Court | प्रेयसीला धोका देणे हा गुन्हा ठरू शकत नाही - हायकोर्ट 

प्रेयसीला धोका देणे हा गुन्हा ठरू शकत नाही - हायकोर्ट 

Next

नवी दिल्ली - प्रेमाच्या आणाभाका घेऊन, विवाहाचे अमिष दाखवून नंतर प्रेयसीला धोका देण्याचे प्रमाण गेल्या काही काळा वाढले आहे. मात्र शरीरसंबंध ठेवल्यानंतर प्रेयसीला प्रेमात धोका देणे ही नैतिकदृष्ट्या कितीही वाईट बाब वाटत असली तरी हा गुन्हा ठरू शकत नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. बलात्काराचा आरोप झालेल्या एका व्यक्तीची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय कायम ठेवताना उच्च न्यायालयाने शारीरिक संबंधांसाठीच्या सहमतीच्याबाबतीत आता 'नाही चा अर्थ नाही'च्या पुढे जाऊन 'हो चा अर्थ हो'इथपर्यंत पोहोचला आहे, असे सांगितले. 

 एका व्यक्तीने  विवाहाचे अमिष दाखवून आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करत एका महिलेने गुन्हा दाखल केला होता. मात्र कनिष्ठ न्यायालयाने यासंदर्भात निर्णय देताना संबंधित व्यक्तीची मुक्तता केली होती, दरम्यान, या निर्णयाला पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर निकाल देताना उच्च न्यायालयाने दोन सज्ञान व्यक्ती परस्पर सहमतीने शरीरसंबंध प्रस्थापित करत असतील तर तो गुन्हा ठरू शकत नाही, असे स्पष्ट केले. तसेच कनिष्ठ न्यायालयाच्या निकालामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी नव्हती, असे न्यायमूर्तींनी सांगितले. 

विवाहाचे अमिष दाखवत शरीरसंबंध ठेवल्याच्या आरोपांचा उपयोग संबंधित महिलेने आरोपीसोबत झालेले आपले शरीरसंबंध योग्य ठरवण्यासाठी केला. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतरसुद्धा या आरोपामधून स्वत:चे वर्तन योग्य असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिने वैद्यकीय तपासणीसही नकार दिला, असे हायकोर्टाने म्हटले आहे.  

 निकाल देताना कोर्टाने पुढे सांगितले की, सदर महिला शरीरसंबंधांसाठी आपली सहमती ही स्वेच्छेने नव्हे तर तर विवाहाचे अमिष दाखवून मिळवण्यात आल्याचे सांगत आहे. मात्र ही बाब सिद्ध  होऊ शकली नाही. पहिल्यांदा बलात्काराचा आरोप केल्यानंतर तीन महिन्यांनी ही महिला आरोपीसोबत आपल्या मर्जीने हॉटेलमध्ये जाताना दिसली. त्यामुळे तिला विवाहाचे अमिष दाखवण्यात आल्याच्या तिच्या दाव्यात फारशी सत्यता नसल्याचे समोर आले आहे.  

Web Title: infidelity against girlfriend is not a crime - Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.