शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीला गोळी मारून प्रियकरानं स्वत:वरही झाडली गोळी; ७ वर्षात प्रेमात अचानक दुरावा का आला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 15:26 IST

मनीष कृतिकाशी बोलायचा प्रयत्न करत होता. परंतु ती ऐकण्यास तयार नव्हती. अखेर ९ तारखेला त्याने कृतिका भेटायला  बोलवले आणि तिच्यावर गोळी झाडली.

२२ वर्षीय कृतिका चौबे सध्या भोपाळच्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. ७ वर्षापूर्वी ज्या युवकाच्या प्रेमात ती बुडाली होती, तोच एक दिवस तिला गोळी मारेल याचा विचारही कृतिकाने केला नसेल. बुंदेलखंड यूनिवर्सिटीजवळ मनीष साहू या प्रियकराने आधी प्रेयसी कृतिकाला गोळी मारली त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडली. या घटनेत युवकाचा जागीच मृत्यू झाला तर युवतीचा प्रकृती सध्या चिंताजनक आहे.

सर्वात हैराण करणारे म्हणजे हा गोळीबार ९ नोव्हेंबरच्या दिवशी झाली, हा तोच दिवस होता जेव्हा ७ वर्षापूर्वी ललितपूर येथे राहणारी कृतिका आणि मनीष यांच्यात प्रेम संबंध सुरू झाले होते. आता ७ वर्षांनी यांच्या प्रेमाचा शेवट गोळीबाराने झाला आहे. मनीषचं लग्न त्याच्या कुटुंबाने केले होते. मात्र तो कृतिका विसरू शकत नव्हता. त्यामुळे लग्नाच्या अवघ्या २ महिन्यांनी त्याने पत्नीला सोडले आणि घरातून बाहेर पडला. कुटुंबानेही मनीषशी संबंध तोडून टाकले. मनीषच्या लग्नानंतर कृतिकाने त्याच्याशी दूर होणे पसंत केले. परंतु मनीषला ते आवडले नाही. कृतिकाने याच वर्षी बुंदेलखंड यूनिवर्सिटीत प्रवेश घेतला होता. ती पहिल्या वर्षाला होती. मनीष कृतिकाशी बोलायचा प्रयत्न करत होता. परंतु ती ऐकण्यास तयार नव्हती. अखेर ९ तारखेला त्याने कृतिका भेटायला  बोलवले आणि तिच्यावर गोळी झाडली.

आधी खायला दिले मग गोळी झाडली

मनीषने युवतीला भेटल्यानंतर खायला दिले, त्यानंतर दोघे बोलत होते. दोघेही बोलता बोलता यूनिवर्सिटीजवळ आले, तेव्हा कृतिका तिच्या हॉस्टेलमध्ये जात होती. तेव्हा दोघांमध्ये वाद झाला. मनीषने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु कृतिकाला काही कळायच्या आधीच त्याने बंदूक काढली आणि तिला गोळी मारली. त्यानंतर स्वत:वरही तिने गोळी झाडली. 

कशी झाली होती भेट?

मनीष साहू आणि कृतिका तालाबपूरा परिसरात राहायला होते. २०१८ साली या दोघांची पहिली भेट झाली. या भेटीतून त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघे एकमेकांच्या प्रेमात इतके बुडाले की, एकमेकांसोबत जगण्या मरण्याचं वचन दिले. त्यात कौटुंबिक स्थितीमुळे मनीष कामकाजात व्यस्त झाला. सरकारी विभागात तो चालक म्हणून काम करत होता. काही महिन्यांपूर्वी कुटुंबाने मनीषचे लग्न लावून दिले. मात्र मनीषला ते लग्न मंजूर नव्हते. लग्नाच्या २ महिन्यानंतर मनीषने ते नाते संपवले. त्यानंतर मागील ६ महिन्यापासून तो कुठे होता हे कुणालाही माहिती नव्हते. त्यातच मनीषच्या मृत्यूने कुटुंबाला धक्का बसला. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Jealous lover shoots girlfriend, then self; love turns deadly.

Web Summary : A 22-year-old woman is battling for her life after her lover shot her and then himself. The man died at the scene. The couple's seven-year relationship ended tragically. The man was married but couldn't forget his ex-girlfriend, leading to the fatal shooting.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी