धक्कादायक! रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; पतीकडूनही नराधमांनी १० लाख लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 19:41 IST2026-03-23T19:41:51+5:302026-03-23T19:41:51+5:30

एका महिलेला रेल्वेत नोकरी लावण्याच्या नावाखाली तिला घरी बोलाविले. तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला.

In Dombivali, Woman raped on the pretext of a job in the railways; The men also robbed her husband of Rs 10 lakh | धक्कादायक! रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; पतीकडूनही नराधमांनी १० लाख लुटले

धक्कादायक! रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; पतीकडूनही नराधमांनी १० लाख लुटले

मुरलीधर भवार

कल्याण: रहीम पद्मसी, करीम जैन आणि करण जोशी अशी तीन नावे धारण करणाऱ्याने रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका महिलेवर बलात्कार केला. इतकेच नाही तर तिच्या पतीला रेल्वेचे कंत्राट मिळवून देतो असे सांगून १० लाख रुपये उकळले. हा व्याजावर पैसे देतो. व्याजाचे पैसे वसूल करण्याच्या बदल्यात महिलांकडून शरीर सुखाची मागणी करतो. पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा जामीन अर्ज आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या प्रकरणात तो फरार असल्याचे फिर्यादीच्या वकिलांनी सांगितले.

डोंबिवलीत अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेला रेल्वेत नोकरी लावण्याच्या नावाखाली तिला घरी बोलाविले. तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्याचे व्हिडीओ शुटींग आणि फोटो काढून तिला दाखविले. हा प्रकार कोणाला सांगितला तर तर हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. अशी धमकी वारंवार देऊन त्याने तिच्यावर काही वर्षे लैगिंक अत्याचार केला. हे करुन तो थांबला नाही. तर पिडीत महिलेच्या पतीला रेल्वेत कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली तिच्या पतीकडून १० लाख रुपये उकळले.

पिडीत महिलेच्या पती याच्या लक्षात आले की, हा व्यक्ती त्याला फसवत आहे. पत्नीमुळे पती या व्यक्तीच्या संपर्कात आला होता. पतीने पत्नीला फसवणूक झाल्याचे सांगितले असता पत्नीने देखील पतीला सांगितले की तिच्या सोबत संबंधित व्यक्ती काय करीत होता. हे ऐकून पतीला जबर मानसिक धक्का बसला. त्याच्या पायाखालजी वाळू घसरली. पती पत्नीने पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे रामनगर पाेलिसांनी रहीम पद्मसी उर्फ करीम मोहंमद जैन उर्फ करम जोशी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ८ मार्च रोजी गुन्हा दाखल झाला. पोलिसानी आरोपीला अद्याप अटक केलेली नाही.

विशेष म्हणजे आरोपी पोलिस ठाण्याच्या जवळच राहतो. त्याला अटक झालेली नसताना त्याने कल्याण न्यायालयात अटक पूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज टाकला होता. त्याच्या जामीन अर्ज फेटाळला असल्याची माहिती फिर्यादीचे वकिल महेश शिवदास यांनी दिली आहे. धक्कादायक म्हणजे फरार आरोपी हा व्याजावर पैसे चालवितो. अनेक महिलांना त्याने व्याजावर पैसे दिले आहे. व्याज पैशाच्या वसूलीकरीता तो संबंधित महिलांकडे शरीर सुखाची मागणी करीत असल्याचा आरोप संबंधित महिलांकडून करण्यात आहे. त्या महिलांनी त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.

Web Title: In Dombivali, Woman raped on the pretext of a job in the railways; The men also robbed her husband of Rs 10 lakh