शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

लव्ह मॅरेज, हुंड्यासाठी छळ..लोखंडी डंबल डोक्यात घातला; दिल्लीतील पोलीस कमांडो काजलला कसं मारलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 12:27 IST

काजल आणि अंकुर यांनी २०२३ साली प्रेम विवाह केला होता. या दोघांना दीड वर्षाचा मुलगा होता.

नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकातील २७ वर्षीय SWAT (स्पेशल वेपन्स अँन्ड टेक्टिक्स) कमांडो कजलाने मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान जीव सोडला आहे. ५ दिवसांपूर्वी पश्चिमी दिल्लीच्या मोहन गार्डनर परिसरात राहणाऱ्या काजलवर तिच्याच पतीने जीममधील लोखंडी डंबलने जीवघेणा हल्ला केला होता. या  हल्ल्यात काजलच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली होती. ज्यामुळे ती कोमात गेली. घटनेच्या दिवशी नेमकं काय घडले याबाबत मृत काजलचा भाऊ निखील याने जे सांगितले त्यामुळे कुणाच्याही अंगाचा थरकाप उडेल.

माहितीनुसार, २०२२ च्या बॅचमध्ये भरती झालेली काजल तिच्या हिंमतीने दिल्ली पोलिसांच्या विशेष SWAT पथकाचा भाग बनली होती. २२ जानेवारीला मोहन गार्डन येथील तिच्या राहत्या घरी पती अंकुरसोबत तिचे वाद झाले होते. अंकुर संरक्षण मंत्रालयात क्लर्क पदावर कार्यरत आहे. रागाच्या भरात पती अंकुरने पत्नी काजलच्या डोक्यावर लोखंडी डंबलने हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. या हल्ल्यानंतर अंकुरने काजलला हॉस्पिटलला नेले आणि नातेवाईकांना फोन करून काजलची हत्या केल्याचे सांगितले. या घटनेनंतर आरोपी पती अंकुरला अटक करण्यात आली होती.

फोनवर भावाने ऐकली बहिणीची किंकाळी

काजलचा मोठा भाऊ निखील हा स्वत: दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर आहे. त्याने घटनेच्या दिवशी घडलेली कहाणी सांगितली. २२ जानेवारीला अंकुरने मला फोन केला होता. त्यावेळी पती-पत्नी यांच्यात वाद सुरू होता. अंकुरने मला कॉल रेकॉर्ड करण्यास सांगितले. या कॉलमध्ये मला काजल ओरडत असताना ऐकायला आले. त्यानंतर मी फोन कट केला. ५ मिनिटांनी पुन्हा अंकुरचा मला कॉल आला. ज्यात त्याने काजलला जीवे मारल्याचे सांगितले असं निखीलने म्हटलं.

काजल आणि अंकुर यांनी २०२३ साली प्रेम विवाह केला होता. या दोघांना दीड वर्षाचा मुलगा होता. लग्नाच्या काही काळानंतर अंकुरच्या कुटुंबाने हुंड्यासाठी काजलचा छळ सुरू केला. कौटुंबिक वाद वाढल्यानंतर दोघे सोनीपतहून दिल्लीच्या मोहन गार्डनला शिफ्ट झाले होते. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची ड्युटी करण्यासाठी काजल दिल्लीला आली होती. त्याचवेळी ही घटना घडली. काजलला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु प्रकृती बिघडल्यानंतर तिला गाझियाबादच्या यशोदा रुग्णालयात आणले. मात्र उपचारावेळी काजलने जीव सोडला. या घटनेनंतर पोलिसांनी अंकुरविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Love Marriage, Dowry Harassment: Delhi Police Commando Killed with Dumbbell

Web Summary : Delhi police commando Kajal was murdered by her husband, Ankur, with a dumbbell due to dowry harassment. Her brother, a Delhi cop, heard her screams on a call. Ankur is arrested; investigation ongoing.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी