शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 10:43 IST

पतीने मारले, धमकावले आणि माझ्यावर नको ते आरोप करत राहिला असं सिताराने सांगितले. सिताराचा कथित प्रियकर अमनबद्दलही तिने स्पष्टीकरण दिले. 

प्रयागराज - शहरातील सितारा आणि कप्तान यांची कहाणी चांगलीच चर्चेत आली आहे. लग्नाच्या पहिल्या रात्रीच चाकूने पतीच्या छातीवर वार करणाऱ्या सिताराने पती कप्तानवर गंभीर आरोप लावले आहेत. त्या रात्री मी नव्हे तर पतीनेच चाकू घेतला होता. मी तर पहिल्या रात्रीच त्याला स्पर्श करून दिला असता परंतु त्याने स्वत:जवळ चाकू ठेवला होता. कप्तानचं याआधीच लग्न झाले आहे आणि त्याला एक मुलगीही आहे असं पत्नीने म्हटलं आहे. 

पत्नी सिताराने माध्यमांना सांगितले की, मी कधी त्याला नकार दिला नाही, मी चाकूही उचलला नव्हता. चाकू त्याच्याकडेच होता आणि तो मला धमकावत होता. लग्नाच्या काही तासानंतरच मला कप्तानचे हे दुसरे लग्न असून याआधीही एक लग्न केल्याचे कळले. त्याला मुलगीही आहे. त्याने माझी फसवणूक केली. इतकेच नाही तर त्याने मला त्याच्या पहिल्या पत्नीशीही बोलायला दिले असं तिने सांगितले आहे.

त्याशिवाय सिताराने तिच्या पतीवर अनेक गंभीर आरोप केलेत. मी पहिल्या रात्री त्याच्यासोबत खोलीत गेले तेव्हा त्याने मला मारहाण सुरू केली. त्याच्या पहिल्या पत्नीनेही मला धमकावले. जर माझ्या पतीला हात लावला तर तुझा जीव घेईन असं सांगितले. लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याने माझा मोबाईल हिसकावून घेतला. कुणाशीही बोलायचे नाही असं बजावले. पतीने वारंवार माझा अपमान केला. मारले, धमकावले आणि माझ्यावर नको ते आरोप करत राहिला असं सिताराने सांगितले. सिताराचा कथित प्रियकर अमनबद्दलही तिने स्पष्टीकरण दिले. 

"मी अमनला ओळखत नाही..."

मी कुठल्याही अमनला ओळखत नाही. माझे त्याच्याशी काय नाते सांगितले जाते हेदेखील माहिती नाही. अमन कप्तानचा मित्र आहे. मला अडकवण्यासाठी त्याचे नाव घेतले जाते. मी प्रियकरासोबत पळाली नाही तर माझा जीव वाचवण्यासाठी घरातून बाहेर गेली. माझा पती सतत मला धमकावत होता. जर मी विरोध केला, कुणाला सांगितले तर माझ्या कुटुंबाला मारण्याचा आणि मलाही जीवे मारण्याची धमकी देत होता असा आरोप सिताराने केला. 

पती कप्तानने काय म्हटले होते?

दरम्यान, सिताराचा पती कप्तानने पत्नीवर आरोप केले होते. लग्नानंतर पत्नीने चाकूने मला मारण्याचा प्रयत्न केला. जर मी तिच्या जवळ आलो तर ती स्वत:लाही संपवेन आणि तुलाही असं तिने धमकी दिली होती. सिताराच्या व्हॉट्सअपवर चॅटिंग होते, त्यातून तिचा प्रियकर अमन असल्याचे कळले. हे जर कुणाला सांगितले तर १०-२० मुलांना घेऊन तुझा गेम करेन असं सिताराने पतीला धमकावल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणात पोलीस कारवाई सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी