'प्रीतीला मारून मी खुश आहे...'; त्या निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याने गर्लफ्रेंडला का मारले? हादरवून टाकणारा कबुलीजबाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 13:28 IST2026-01-20T13:27:37+5:302026-01-20T13:28:17+5:30

"मी तिला मारून खूप आनंदी आहे, मला कशाचाही पश्चात्ताप नाही," असे म्हणत हा नराधम पोलिसांसमोर हसत होता.

'I am happy to kill Preeti...'; Why did that retired railway employee kill his girlfriend? Shocking confession | 'प्रीतीला मारून मी खुश आहे...'; त्या निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याने गर्लफ्रेंडला का मारले? हादरवून टाकणारा कबुलीजबाब

'प्रीतीला मारून मी खुश आहे...'; त्या निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याने गर्लफ्रेंडला का मारले? हादरवून टाकणारा कबुलीजबाब

उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एका ६४ वर्षीय निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याने आपल्या ३२ वर्षीय पत्नीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. इतकेच नव्हे, तर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेहाचे तुकडे करून घराच्या छतावरच जाळले. अटक झाल्यानंतर आरोपीने दिलेली कबुली ऐकून पोलिसांनाही धक्का बसला आहे. "मी तिला मारून खूप आनंदी आहे, मला कशाचाही पश्चात्ताप नाही," असे म्हणत हा नराधम पोलिसांसमोर हसत होता.

नेमकं प्रकरण काय?

राम सिंह परिहार (६४) हा रेल्वेतून वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून निवृत्त झाला आहे. त्याचे प्रीती (३२) नावाच्या महिलेशी गेल्या १० वर्षांपासून प्रेमसंबंध होते आणि ते दोघे एकाच घरात पती-पत्नीसारखेच राहत होते. राम सिंहच्या दाव्यानुसार, प्रीतीने त्याच्याकडून आजवर लाखो रुपये उकळले होते आणि त्याची पेन्शनही तीच खर्च करत होती. मात्र, काही काळापूर्वी प्रीतीचे एका ब्युटी पार्लर चालकाशी प्रेमसंबंध असल्याचे राम सिंहला कळाले. यावरून दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते.

कुऱ्हाडीने वार अन् क्रूरतेचा कळस

८ जानेवारी रोजी राम सिंह आणि प्रीतीने एकत्र बसून मद्यप्राशन केले. यावेळी प्रीतीने त्याच्याकडे ३ लाख रुपयांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. याच रागातून राम सिंहने कुऱ्हाडीने प्रीतीच्या डोक्यावर वार करून तिला ठार केले. हत्येनंतर त्याने दोन क्विंटल लाकूड आणि एक मोठा लोखंडी बॉक्स मागवला. या बॉक्समध्ये मृतदेहाचे तुकडे भरून त्याने ते जाळले.

अस्थिविसर्जन करून आत्महत्या करण्याचा होता प्लॅन

हत्येचे पाप धुण्यासाठी राम सिंहने मोठी योजना आखली होती. मृतदेह पूर्णपणे जळल्यानंतर त्याने स्वतःचे मुंडण केले. प्रीतीच्या अस्थि आणि राख एका गोणीत भरून त्याला प्रयागराजला जाऊन गंगेत विसर्जित करायच्या होत्या. त्यानंतर तो स्वतःही आत्महत्या करणार होता. मात्र, १७ जानेवारीच्या रात्री ही राख आणि अवशेष घेऊन जाताना लोडिंग वाहनाच्या चालकाला संशय आला. पेटीतून दुर्गंधी येत असल्याने चालकाने तत्काळ पोलिसांना कळवले आणि या भीषण हत्याकांडाचा खुलासा झाला.

पोलिसांसमोर हसत होता आरोपी

पोलिसांनी राम सिंहसह त्याची दुसरी पत्नी गीता आणि मुलगा नितीन यांनाही या कटात सामील असल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. अटकेनंतर राम सिंहच्या चेहऱ्यावर भीतीऐवजी एक विचित्र आनंद होता. तो कॅमेऱ्यासमोर हसत "मी तिला मारून सुखी आहे" असे म्हणत होता. मात्र, पोलीस कोठडीत त्याला स्वतःच्या एनकाउंटरची भीती वाटत असल्याचेही त्याने म्हटले.

Web Title : सेवानिवृत्त व्यक्ति ने प्रेमिका की हत्या की, शव के टुकड़े किए; खुशी का दावा।

Web Summary : झाँसी में एक सेवानिवृत्त रेलवे कर्मचारी ने अपनी प्रेमिका की हत्या कर दी, उसके शरीर के टुकड़े कर दिए और अवशेषों को जला दिया। उसने कबूल किया कि उसे खुशी महसूस हो रही है और कोई पछतावा नहीं है, जिससे पुलिस हैरान रह गई। उसे उस पर बेवफाई और वित्तीय शोषण का संदेह था।

Web Title : Retired man kills girlfriend, dismembers body; claims happiness.

Web Summary : A retired railway worker in Jhansi murdered his girlfriend, chopped her body, and burned the remains. He confessed, stating he felt happy and had no regrets, shocking the police. He suspected her of infidelity and financial exploitation.