नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 18:03 IST2025-06-07T18:02:35+5:302025-06-07T18:03:36+5:30

या प्रकारावरून पती-पत्नी यांच्यात जोरदार भांडण झाले. त्यानंतर शंकर पत्नी आणि त्या माणसालाही बेदम मारले.

Husband surrenders to police after beheading wife in Bengaluru | नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...

नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...

बंगळुरू - शहराच्या बाहेरील भागात हत्येची खळबळजनक घटना घडली आहे. याठिकाणी एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आणि त्यानंतर तिचे कापलेले मुंडके घेऊन बाईकवरून थेट पोलीस स्टेशनला पोहचला. घडलेल्या गुन्ह्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली ते ऐकून अधिकारीही हैराण झाले. या आरोपी पतीवर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

माहितीनुसार, बंगळुरूच्या चंदापुरा भागात ही घटना घडली. यातील आरोपीचं नाव शंकर असून तो २८ वर्षाचा आहे. हेन्नागारा भागात तो पत्नी मानसीसह राहत होता. या दोघांनी प्रेमविवाह केला होता. अलीकडेच गावात त्यांनी भाड्याने खोली घेऊन राहत होते. ३ जूनच्या रात्री शंकर कामानिमित्त बाहेर गेला होता, त्याला परतण्यास रात्री उशीर झाला. रात्रीच्या अंधारात तो घरी परतला तेव्हा घराचे दार उघडताच जे दृश्य त्याने पाहिले त्याने त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. शंकरची पत्नी परपुरुषासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती. 

या प्रकारावरून पती-पत्नी यांच्यात जोरदार भांडण झाले. त्यानंतर शंकर पत्नी आणि त्या माणसालाही बेदम मारले. त्यानंतर रागाच्या भरात शंकरने पत्नी मानसीचा गळा कापून हत्या केली. हत्येनंतर शंकरने जे थरारक कृत्य केले त्याने पोलीस स्तब्ध झाले. त्याने पत्नीचे मुंडके एका बॅगेत भरले आणि बाईकवर बसून थेट सूर्यनगर पोलीस स्टेशन गाठले. तिथे तो पोलिसांना शरण जात पत्नीच्या हत्येची कबुली दिली. 

दरम्यान, शंकर आणि त्याच्या पत्नीत नेहमी भांडण होत असे. मानसीने बऱ्याचदा शंकरला वेगळे होण्याची मागणी केली होती. तो तिचा मानसिक छळ करत होता. गुरुवारी रात्री या दोघांमध्ये वाद झाला होता. या वादाचे रुपांतर पत्नीच्या हत्येत झाले. सध्या सूर्यनगर पोलीस या प्रकाराची आणखी चौकशी करत आहे. घटनेवेळी घरात असणारा दुसरा युवक कोण होता आणि त्याची भूमिका काय होती याची चौकशी पोलीस करत आहेत. या प्रकरणाची विविध अँगलने पोलीस चौकशी करत असून पुढील तपास सुरू आहे. 

Web Title: Husband surrenders to police after beheading wife in Bengaluru