शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
3
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
4
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
5
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
6
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
7
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
8
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
9
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
10
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
11
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
12
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
13
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
14
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
15
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
16
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
17
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
18
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
19
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
20
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट : बलात्काराचा खटला निकाली काढण्यासाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 00:48 IST

आष्टी तालुक्यातील पांढुर्णास्थित आदिवासी आश्रम शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर बलात्कार करणारा आरोपी राजू ऊर्फ राजकुमार केशव लांडगे (५०) याच्याविरुद्ध खटला निकाली काढण्यासाठी वर्धा येथील विशेष सत्र न्यायालयाला ६ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ठळक मुद्देआदिवासी आश्रम शाळेतील प्रकरण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आष्टी तालुक्यातील पांढुर्णास्थित आदिवासी आश्रम शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर बलात्कार करणारा आरोपी राजू ऊर्फ राजकुमार केशव लांडगे (५०) याच्याविरुद्ध खटला निकाली काढण्यासाठी वर्धा येथील विशेष सत्र न्यायालयाला ६ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यासंदर्भात आदेश जारी केला.यापूर्वी विशेष सत्र न्यायालयाने या दोन प्रकरणांत वेगवेगळा खटला चालवून आरोपीला एका खटल्यात ५ ऑक्टोबर २०१७ रोजी भादंविच्या कलम ३७६(२)(आय) अंतर्गत जन्मठेप व ५००० रुपये दंड तर, दुसऱ्या खटल्यामध्ये ११ जानेवारी २०१८ रोजी भादंविच्या कलम ३७६(ई) (अत्याचाराच्या गुन्ह्याची पुनरावृत्ती) अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. विधी सेवा विभागाकडून पुरेसा अनुभव नसलेला व असक्षम वकील बाजू मांडण्यासाठी देण्यात आला. त्यामुळे योग्य बचाव करता आला नाही असा मुद्दा त्याने मांडला होता. त्यात तथ्य आढळून आल्यामुळे उच्च न्यायालयाने २६ ऑक्टोबर २०१८ रोजी सत्र न्यायालयाचे निर्णय रद्द केले व या दोन्ही प्रकरणांवर दोषारोप निश्चितीच्या टप्प्यापासून नव्याने खटला चालविण्याचा आदेश दिला. त्यानंतर निर्धारित मुदतीत खटला निकाली निघू शकला नाही. त्यामुळे सत्र न्यायालयाने अर्ज दाखल करून मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती. ती विनंती मान्य करण्यात आली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRapeबलात्कारSchoolशाळा