शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

हृदय पिळवटणारा आक्रोश! दांडीया पाहून गावी परतणाऱ्या दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 7:02 PM

Accident Case : कचरा डंपरला धडक : शाहुपूरीतील दुर्घटना; दोघे गंभीर जखमी

ठळक मुद्देकोल्हापुरात नवरात्रोत्सवाचा दांडीया पाहून गावी परत जाताना ही दुर्घटना घडली.दुर्घटनेत दुचाकीवर पाठीमागे बसलेले शिवाजी विकास नेमणे (१८, रा. कांटे, शाहूवाडी) व करण पाटील (रा. काळजवडे, पन्हाळा) हे दोघे गंभीर जखमी झाले.

कोल्हापूर/ बाजाभोगाव : कचरा भरून निघालेल्या डंपरला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. त्याचे दोघे साथीदार गंभीर जखमी झाले. ओमकार दिनकर मुगडे (१९, रा. काळजवडे, ता. पन्हाळा) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. दुर्घटनेत दुचाकीवर पाठीमागे बसलेले शिवाजी विकास नेमणे (१८, रा. कांटे, शाहूवाडी) व करण पाटील (रा. काळजवडे, पन्हाळा) हे दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास शाहुपूरी पाचव्या गल्लीत गवत मंडईनजीक घडला. कोल्हापुरात नवरात्रोत्सवाचा दांडीया पाहून गावी परत जाताना ही दुर्घटना घडली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महानगरपालिकेच्या कचरा उठाव डंपरवर सतीश देवेकर हे चालक म्हणून काम करतात. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ते कचरा गोळा करण्यासाठी डंपर घेऊन गोकुळ हॉटेलकडून गवत मंडईकडे जात होते. पटेल स्पेअरपार्टजवळ डंपर आला असता पाचव्या गल्लीतून भरधाव आलेल्या दुचाकीने डंपरच्या इंधन टाकीजवळ जोराची धडक दिली. अपघातानंतर देवेकर यांनी डंपर थांबवून उतरून पाहिले तेव्हा तिघे तरुण गंभीर जखमी अवस्थेत पडले होते. घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचले होते. जखमींना अग्निशमन वाहनांच्या मदतीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. अपघातातील ओंकार मुगडे याच्या डोक्याला, छातीला गंभीर दुखापत झाल्याने अंतर्गत रक्तस्त्राव होऊन त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर इतर दोघा सहकाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.

गावी जाताना दुर्घटनाअपघातातील ओंकार मुगडे, शिवाजी नेमणे व करण पाटील हे तिघेही पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील आहेत. त्यांच्या गावातील एकाचे शहरात हॉटेल असून तिघेही तिथे काम करत होते. नवरात्रीनिमित्त देवदर्शन व दांडीया पाहण्याचे ठरवून तिघे हॉटेलवरून निघाले. शहरात फेरफटका मारून तिघेही गावी जाणार होते. तोपर्यंत दुर्घटना घडली.

हृदय पिळवटणारा आक्रोशओंकार मुगडे हा हॉटेलमध्ये काम करून कोपार्डे (ता. करवीर) येथील स. ब. खाडे महाविद्यालयात प्रथम वर्ग बी. ए. च्या वर्गात शिकत होता. आई-वडील शेती करून उदरनिर्वाह करत आहेत. घरची परिस्थिती बेताची आहे. त्याच्या मृत्यूची बातमी घरी कळताच नातेवाईकांनी हृदय पिळवटणारा अक्रोश केला. त्याच्या पश्चात वडील, आई, दोन बहिणी असा परिवार आहे. सकाळी काळजवडे गावातच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघातtwo wheelerटू व्हीलरkolhapurकोल्हापूरPoliceपोलिसDeathमृत्यू