शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 5:01 AM

केंद्र सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे असते. उत्पादक शेतकऱ्यांचा कधीच विचार केला जात नाही. शेतकरी असंघटित आहेत.

केंद्र सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे असते. उत्पादक शेतकऱ्यांचा कधीच विचार केला जात नाही. शेतकरी असंघटित आहेत. परिणामी, त्यांच्या राेषाच्या राजकीय परिणामांची नाेंद घेण्याचे कारण उरत नाही. नेहमीच ग्राहकहिताचा विचार करून देशांतर्गत शेतमालाची उपलब्धता आणि भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी वारंवार निर्यातबंदी लादली जाते. गहू, साखर, कांदा, बिगरबासमती तांदूळ आदी मालावर केंद्र सरकारने निर्यातबंदी लागू केली आहे. कांद्याच्या निर्यातबंदीसाठी ८ डिसेंबर २०२३ राेजी अधिसूचना काढण्यात आली. यापूर्वीच केंद्र सरकारने राष्ट्रीय सहकारी निर्यात संस्थेला कांदा निर्यातीची परवानगी दिली हाेती.

या संस्थेमार्फत श्रीलंका, बांगलादेश, दुबई, भूतान, बहारीन, माॅरिशस या सहा देशांना ९९ हजार १५० टन कांदा निर्यात करण्यात येणार हाेता. ही निर्यात संस्था जानेवारी-२०२३ मध्ये सहकार कायद्याखाली नाेंदविली गेली आहे. तिच्याकडे काेणत्याही पायाभूत सुविधा नाहीत. परिणामी, सहा देशांना केवळ ५ हजार ४५४ टन कांद्याची निर्यात केली गेली. या कारभारामुळे कांद्याचे भाव न वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये असंताेष आहे. निर्यातदार कंपन्याही नाराज आहेत. केंद्र सरकारच्या या संस्थेला काेणताही अनुभव नसताना शेतकऱ्यांकडून कांद्याची खरेदी न करता व्यापाऱ्यांकडून ताे खरेदी करून निर्यात करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कांद्याच्या निर्यातबंदीविरुद्ध  नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, धाराशिव, सातारा, धुळे या जिल्ह्यांत  असंताेष वाढताे आहे. राष्ट्रीय सहकारी निर्यात संस्थेला (एनसीईएल) पूर्वीच दिलेल्या कांदा निर्यातीच्या परवानगीचा वापर करीत केंद्र सरकारच्या वतीने जणू नवीनच घाेषणा करण्यात आली, अशी बातमी दाेन दिवसांपूर्वी पेरण्यात आली.

शेतकऱ्यांचा राेष कमी करण्यासाठी कांद्याला दिलेली ही फाेडणी काही जमली नाही. बारकाईने पाहणाऱ्यांच्या लगेच लक्षात आले की, हे प्रकरण जुनेच आहे. केंद्र सरकारने गेल्या डिसेंबर महिन्यात लागू केलेली कांदा निर्यातबंदी कायम आहे. देशात अन्नधान्य आणि शेती आधारित सर्व प्रकारच्या उत्पादनांचा पुरवठा कायम राहावा, शेतमालाचे भाव वाढू नयेत, यासाठी केंद्र सरकार वारंवार निर्यातबंदीचा एकमेव मार्ग निवडते. परिणामी, भारताला आंतरराष्ट्रीय शेतमाल आणि अन्नधान्य व्यापारात काेणी गांभीर्याने घेत नाही. आजही आंतरराष्ट्रीय व्यापारात भारताचा टक्का केवळ अडीच आहे. अंतर्गत बाजारपेठेत शेतमालाचे भाव पडतात तेव्हा शेतमाल उत्पादकांना आधार देणारी काेणतीही याेजना सरकार राबवत नाही. याउलट भाव वाढू लागले किंवा उत्पादन कमी हाेण्याची शक्यता निर्माण झाली की, तातडीने निर्यातबंदीचे हत्यार उपसले जाते. केंद्र सरकारच्या या धाेरणामुळे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जागतिक व्यापाराचे फायदे पाेहोचलेलेच नाहीत. या धरसाेड वृत्तीचा परिणाम उत्पादनावरही हाेताे. भाव काढल्याने ग्राहकांना त्रास हाेत असेल तर त्यांना दिलासा देणारी याेजना सरकारने आखावी. शेतमाल स्वत: खरेदी करून ग्राहकांना किफायतशीर भावात विकण्याचा पर्याय का निवडू नये? शेतकरी चळवळीतील नेत्यांनी तसेच कृषी अर्थशास्त्रज्ञांनी याचा विचार करून अनेक पर्याय सरकारसमाेर ठेवले आहेत. पण, सरकार त्या पर्यायांचा विचारच करायला तयार नाही. शेतमालाला हमीभाव देण्याचा कायदा करण्याच्या मागणीवर कृती केली जात नाही.

कांद्याच्या निर्यातबंदीचा जुना निर्णय कायम असताना नव्याने निर्यातीला परवानगी दिल्यासारखे दाखविणारी फसवी घाेषणा करायचे कारण काय? नव्याने निर्यातीची काेणतीही अधिसूचना नसताना केंद्र सरकारच्या वतीने बेमालूमपणे थापा मारणारी बातमी कशी दिली जाऊ शकते? गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिल्याने या असंताेषात भरच पडली.  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी, निर्यातदारांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. युक्रेन-रशिया किंवा इस्राइल-पॅलेस्टाइन युद्धाचे कारण देऊन आंतरराष्ट्रीय बाजारात तणावपूर्ण परिस्थिती आहे, असेही खाेटे सांगितले जाते. बिगरबासमती तांदळावर बंदी असताना बासमतीचा निर्यात व्यापार बावीस टक्क्यांनी वाढला आहे. भारताने आता कधीतरी आयात-निर्यात धाेरण, काेट्यवधी शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण आणि देशांतर्गत पुरवठा यांचा सखाेल विचार करून उत्पादकांना न्याय देणारे धाेरण ठरविणे गरजेचे आहे. अन्यथा, याचा नकारात्मक परिणाम शेतकऱ्यांना शेती साेडण्यास भाग पाडेल... आणि मग देशाच्या भल्यामाेठ्या लाेकसंख्येची भूक कशी भागविणार, या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही.

टॅग्स :onionकांदा