शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात लेटमार्कने! पश्चिम रेल्वे विस्कळीत, बोरीवलीत तांत्रिक बिघाड
2
“NDAत येण्यासाठी उद्धव ठाकरेंचा PM मोदींना अनेक लोकांच्या माध्यमातून मेसेज”; शिंदे गटाचा दावा
3
OMA vs NAM : नामिबियाचा 'सुपर' विजय! ओमानची कडवी झुंज; केवळ ११० धावा पण सामना गाजला
4
“थोरातांची वैचारिक दिवाळखोरी दिसून येते, स्वतःला नेते समजतात पण...”: राधाकृष्ण विखे पाटील
5
Exit Poll सुद्धा 'कन्फ्युज'! महाराष्ट्राचा नेमका कौल असणार तरी काय?
6
आरोग्य सांभाळा! जास्त तहान लागत असेल तर सावधान; 'या' ५ आजारांचा वाढू शकतो धोका
7
अल्लाह तुमच्या सर्व समस्या जाणून आहे, त्यामुळे संयम ठेवा; Sania Mirza ची पोस्ट
8
Share Market : शेअर बाजाराला 'एक्झिट पोल'चा बूस्टर; सेन्सेक्समध्ये २६०० अंकांपेक्षा अधिक तेजी
9
"EVM मध्ये छेडछाड झाली नाही तर हिमाचलमधील चारही जागा काँग्रेसला मिळतील"
10
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
11
NAM vs OMA : WHAT A MATCH! ओमानने नामिबियाच्या तोंडचा घास पळवला, Super Over मध्ये निकाल
12
अनेक वर्षे होती सत्ता, पण या राज्यात काँग्रेसला उमेदवारा मिळेनात, ४१ जागांवर केलं सरेंडर
13
लग्नमंडपात पसरली शोककळा; मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, 15 जखमी
14
मध्यरात्री लपून झाडांची कत्तल केल्याप्रकरणी पाेलिसांकडून पुण्यातील गेरा बिल्डरवर गुन्हा
15
'येऊ कशी तशी मी नांदायला' फेम अभिनेता झाला बाबा, चाहत्यांकडून अभिनंदन
16
शिव ठाकरे डेझी शाहसोबत करणार लग्न?, अखेर अभिनेत्रीनं सोडलं मौन
17
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता
18
पंचग्रही अद्भूत शुभ योग: ७ राशींना लाभ, लॉटरीची संधी; राजकारण्यांना यश, इच्छापूर्तीचा काळ!
19
Exit Polls चा परिणाम : आज 'मोदी स्टॉक्स'मध्ये दिसू शकते तेजी, काय म्हणताहेत एक्सपर्ट्स? जाणून घ्या
20
'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता

मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 6:30 AM

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे घडलेल्या अपघातात अनिस अवधिया, अश्विनी कोस्टा हे दोघे मृत्युमुखी पडले.

पुणे : मी कार चालविण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही, वाहन चालविण्याचा परवानाही नाही, तरी वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्श कार माझ्याकडे दिली, मित्रांसह हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली. मी मद्यप्राशन करताे हे वडिलांना माहिती आहे, असे आरोपीने सांगितले. चौकशीदरम्यान त्याने पोलिसांना ही माहिती दिली. पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे घडलेल्या अपघातात अनिस अवधिया, अश्विनी कोस्टा हे दोघे मृत्युमुखी पडले. या प्रकरणी ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह अल्पवयीन मुलाला बार, पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हाॅटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हाॅटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, आरोपी अल्पवयीनच असून, जन्माचा पुरावा मिळाला आहे. मुलाला न्यायालयाने दिलेल्या जामिनाविरोधात अपील करणार आहोत. अल्पवयीन मुलाने चालविलेली कार विनाक्रमांक व विनारजिस्ट्रेशन हाेती. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले, अपघातग्रस्त कार मुंबई डीलरने रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण न करताच दिली आहे. 

न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी अपघातानंतर अल्पवयीन मुलाला बाल न्यायालयाने काही अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला. मुलाला न्यायालयाने १५ दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्यास सांगितले. तसेच, ‘अपघात’ या विषयावर निबंध लिहिण्याची अट घातली. तसेच येरवडा वाहतूक पोलिसांसोबत वाहतूक नियमन करणार आहे. दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या करोडपतीच्या मुलाला निबंध लिहिणे, वाहतूक पोलिसांसोबत काम करणे अशा शिक्षा असतात का, असा सवाल शहरवासीयांनी व्यक्त केला आहे.

आरोपीला व्हीआयपी वागणूक  अल्पवयीन मुलाला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्याला व्हीआयपी वागणूक दिल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला आहे. पिझ्झा बर्गरही बाहेरून आणून दिल्याचे ते म्हणाले. अपघाताबाबत अनेकांनी संवेदना व्यक्त केल्या. कँडल मार्च काढले गेले. मात्र, मृतांच्या नातेवाइकांना भेटण्याची तसदी कुठल्याही नेत्याने, नागरिकाने घेतली नाही, असा खेदही व्यक्त केला. अश्विनी, अनिस यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस