शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

Video : बॉलिवूडच्या 'बादशहा'ची भेट घडवतो म्हणून सांगितलं अन् तस्करीसाठी तरुणीला मुंबईत आणलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 22:09 IST

Crime News :आरोपी शेखने पीडित मुलीला फेसबुकच्या माध्यमातून आपल्या जाळ्यात अडकवले होते.

ठळक मुद्दे कोलकाता पोलिसांनी मुंबई गाठली आणि पीडितेला परत नेले. यासह आरोपीचा ताबा घेत पुढील चौकशीसाठी कोलकाता येथे नेण्यात आले आहे.

बॉलिवूडचा बादशाह  म्हणजेच शाहरुख खानसोबत भेट करून देण्याच्या आमिषाने पश्चिम बंगालमधील १७ वर्षीय निरागस मुलीला मुंबईत आणणाऱ्या टोळीला दादर लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद करत पीडितेची सुटका केली आहे.जीआरपीकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलीला मानवी तस्करीखाली मुंबईत आणले होते. शाहरुखच्या वांद्रे येथील बंगल्यात भेटेल, असे पीडित मुलीला सांगण्यात आले. मुलगी आरोपीच्या बतावणीत फसली आणि ती मुंबईत आली. इयत्ता १२ वीमध्ये शिकणार्‍या आरोपीने स्वत: चा कार्यक्रम व्यवस्थापक (इव्हेंट मॅनेजर) म्हणून मुलीला आपली ओळख करून दिली. शाहरुख खानशी त्याचे संपर्क असल्याचे त्याने म्हटले होते. इव्हेंट मॅनेजर म्हणून ओळखल्या गेलेल्या शुभान शेख याला मीरा रोड येथून पोलिसांनीअटक केली. पीडित मुलगी कोलकातापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पालशिपारा या भागात राहणारी आहे. कोलकाता पोलिसांनी मुंबई गाठली आणि पीडितेला परत नेले. यासह आरोपीचा ताबा घेत पुढील चौकशीसाठी कोलकाता येथे नेण्यात आले आहे.आरोपी शेखने पीडित मुलीला फेसबुकच्या माध्यमातून आपल्या जाळ्यात अडकवले होते. दादर जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हावडा जंक्शन येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगी पाहिल्यानंतर पोलिसांनी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांना सतर्क केले, तेथे आरोपींला वेळीच वेसण घालत आम्ही मुलीला सुटका केली.

टॅग्स :Arrestअटकwest bengalपश्चिम बंगालDadar Stationदादर स्थानकPoliceपोलिसShahrukh Khanशाहरुख खानHuman Traffickingमानवी तस्करी