शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 06:34 IST

बांगलादेशातील बिष्णूपूरचा रहिवासी असलेला शेख मजुरीचे काम करत होता. २००४ मध्ये सीमेवर जवानांची नजर चुकवून एजंटच्या मदतीने तो मुंबईत आला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नदी, डोंगर पार करत मुंबई गाठलेल्या एका बांगलादेशीने नवी मुंबईतील एका महिलेशी ओळख वाढवली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी संसार थाटला, अशी माहिती कफपरेड पोलिसांच्या कारवाईतून समोर आली. लग्नाच्या काही वर्षांनंतर पती बांगलादेशी असल्याचे समजताच तिला धक्का बसला. मात्र, मुलांच्या भविष्याचा विचार करता तिने ही माहिती लपविल्याचे  निष्पन्न झाले. सबूर ऊर्फ इब्राहिम रोकाला शेख (४०) असे त्या बांगलादेशीचे नाव आहे. कफपरेड पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

बांगलादेशातील बिष्णूपूरचा रहिवासी असलेला शेख मजुरीचे काम करत होता. २००४ मध्ये सीमेवर जवानांची नजर चुकवून एजंटच्या मदतीने तो मुंबईत आला. नवी मुंबईत काम करताना एका महिलेशी त्याची ओळख झाली. त्याने बांगलादेशी असल्याची ओळख लपवत तिच्याशी लग्न केले. त्यांना मुले झाली. वडिलांचे निधन झाले म्हणून तो बांगलादेशला परतला. २००७ मध्ये त्याने पुन्हा मुंबई गाठली. बऱ्याच वर्षांनी तो घरी परतल्याने पत्नीला संशय आला. तिने चौकशी केली असता तो बांगलादेशी असल्याचे समजले. त्याने आधार,  मतदार कार्डही बनवले.

पोलिसांच्या चौकशीत आढळली बनावट कागदपत्रे३ मे रोजी तो कफपरेड पोलिस ठाण्याच्या आरसी चर्च परिसरात आल्याची माहिती एटीसी सेलला मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप विश्वासराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत भोसले, अंमलदार भामरे, गायकवाड यांनी सापळा रचत शेखला ताब्यात घेतले. चौकशीत कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट होताच त्याला अटक केली. 

सात बांगलादेशींवर कारवाई ट्रॉम्बे पोलिसांनी सात बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली. यामध्ये दोन कुटुंबीयांचा समावेश आहे. यातील सातही वाशीला राहण्यास होते. पियार अली (७१), फरीद अली (३०), सुहाना शेख (२५), मोहम्मद शेख (४०), अहमद शेख (३), अस्लम शेख (१९), मोहम्मद शेख (१९) अशी त्यांची नावे आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी