अर्धनग्न होऊन गुरू अल्पवयीन विद्यार्थ्याकडून घेत होता तेल मसाज, बळजबरीने ठेवले अनैसर्गिक संबंध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 04:00 PM2022-03-01T16:00:51+5:302022-03-01T16:01:34+5:30

Sexual Abuse Case :जय मिश्रा याने विद्यार्थ्याला तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे.

Half-naked, Guru was taking oil massage from a minor student, forcibly having unnatural relations | अर्धनग्न होऊन गुरू अल्पवयीन विद्यार्थ्याकडून घेत होता तेल मसाज, बळजबरीने ठेवले अनैसर्गिक संबंध

अर्धनग्न होऊन गुरू अल्पवयीन विद्यार्थ्याकडून घेत होता तेल मसाज, बळजबरीने ठेवले अनैसर्गिक संबंध

Next

मिर्झापूर : पद्मविभूषण पुरस्कार विजेते जगद्गुरू राम भद्राचार्य यांचे उत्तराधिकारी जय मिश्रा यांच्यावर अनैसर्गिक लैंगिक संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. चित्रकूटच्या तुलसीपीठ संस्थेच्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने हा गंभीर आरोप केला आहे.

पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल
पीडित विद्यार्थिनीने घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला तेव्हा सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. २७ फेब्रुवारी रोजी पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून लालगंज पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जय मिश्रा याने विद्यार्थ्याला तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे.

व्याकरणाचा अभ्यास करणारा विद्यार्थी
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा जौनपूर जिल्ह्यातील हा अल्पवयीन विद्यार्थी गेल्या ७ महिन्यांपासून मध्य प्रदेशातील चित्रकूट-सतना येथील तुलसीपीठ कांच मंदिर जानकी कुंड येथे दीक्षा घेत आहे. अल्पवयीन विद्यार्थीही येथे राहून व्याकरणाचे शिक्षण घेत आहे. 8 फेब्रुवारी 2022 ते 14 फेब्रुवारी 2022 दरम्यान जानकी कुंज दुर्गा मंदिर तेंदुई लालगंज मिर्झापूर येथे तुलसीपीठाधीश्‍वर महाराज श्री रामभद्राचार्य यांच्या श्रीमद भागवत कथेचा कार्यक्रम पार पडला.


अर्धनग्न होऊन तेल मालिश करण्यास सांगितले
तुलसीपीठाधीश्‍वर महाराज श्री रामभद्राचार्य यांचे उत्तराधिकारी आचार्य रामचंद्र दास उर्फ ​​जय मिश्रा हे अल्पवयीन विद्यार्थ्याला कार्यक्रमाला घेऊन गेले होते. 13 फेब्रुवारीच्या रात्री 10 वाजता जय मिश्रा याने अल्पवयीन मुलाला आपल्या खोलीत बोलावले आणि अर्धनग्न अवस्थेत तेल मालिश करण्यास सांगितले. एवढेच नाही तर जय मिश्राने त्याच्यासोबत अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. नकार दिल्यावर जय मिश्रा याने जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करून अल्पवयीन मुलाचे कपडे काढून मारहाण केली. जय मिश्राने रिव्हॉल्वर दाखवत धमकी दिली की, हे सर्व कुणाला सांगितले तर गोळ्या घालीन.

Web Title: Half-naked, Guru was taking oil massage from a minor student, forcibly having unnatural relations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.