'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 03:27 PM2024-06-16T15:27:04+5:302024-06-16T15:27:21+5:30

प्रसाद ओकची पत्नी मंजिरीने फादर्स डे निमित्त प्रसादसाठी खास पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट तुम्हालाही भावूक करुन जाईल (prasad oak)

actor Prasad oak wife Manjiri oak special post on the occasion of Father's Day | 'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट

'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट

आज फादर्स डे निमित्त सुप्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओकची बायको मंजिरीने त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. मंजिरीने लिहिलेली पोस्ट आपल्या चेहऱ्यावर हसू आणते आणि नकळत भावूक करुन जाते. मंजिरीने प्रसाद आणि तिच्या कुटुंबाचे खास फोटो शेअर केले आहेत. मंजिरी लिहिते, “प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते” असं म्हणतात ना ??? (कित्ती टिपीकल वाक्य आहे ) पण एका यशस्वी आई च्या मागे एक “मधे मधे न येणारा” बाबा असतो.. तू “तो” बाबा आहेस प्रसाद… 

मंजिरी पुढे लिहिते, "२/३ वर्षातून एकदाच parents meeting ला जाऊन.. मुलांच्या complaints ऐकल्यानंतर.. तिथून येताना मुलांना कबुतरांना दाणे खायला घालणारा बाबा आहेस तू…“बाबाला विचारून सांगते” असं माझ्या तोंडून ऐकल्यावर त्यावर भाबडे पणानी विश्वास ठेवणारा बाबा आहेस तू… अचानक “अभ्यासाविषयी चौकशी करणारा” आणि त्यावर “स्वतःच हसणारा” बाबा आहेस तू… घरात मंजू च boss आहे हे आपल्या आयुष्याच्या पहिल्या क्षणापासून accept करणारा बाबा आहेस तू."


मंजिरी शेवटी लिहिते, "अचानक कधीही मुलांना “ठीक आहेस ना” असं विचारणारा बाबा आहेस तू… मुलांच्या वेगवेगळ्या वयात तुझ्या “त्याच वयात” राहिलेला बाबा आहेस तू… लहानपणी मुलांना आणलेली खेळणी त्यांच्याशीच भांडून खेळणारा बाबा आहेस तू… आणि मोठे झाल्यावर त्यांचे नवे “shoes” त्यांना न सांगता हळूच घालून जाणारा बाबा आहेस तू… थोडक्यात काय , एका “गुणी आईच्या मुलांचा” बाबा आहेस तू… मुलं आणि मस्कारा पण मोठी झाली प्रसाद…. तू कधी होणार???? पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांच्या डोळ्यात ज्याच्याविषयी अत्यंत आदर आणि प्रेम असणारा बाबा आहेस तू …. अरे by the way HAPPY FATHERS DAY…!!!"

Web Title: actor Prasad oak wife Manjiri oak special post on the occasion of Father's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.