शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रिव्हॉल्व्हरच्या धाकावर १३ लाखांची लूट करणारी टोळी जेरबंद, कळवा पोलिसांची कारवाई

By जितेंद्र कालेकर | Updated: April 23, 2025 01:09 IST

राेख रकमेसह सहा लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त...

ठाणे: चाकू आणि रिव्हाॅल्व्हरच्या धाकावर रिक्षातील प्रवाशांकडून १३ लाखांची राेकड लुटणाऱ्या विवेक वाघमाेडे (२२, रा. कुडूस, पालघर) याच्यासह तिघांना अटक केल्याची माहिती सहायक पाेलीस आयुक्त प्रिया ढमाळे यांनी मंगळवारी दिली. आराेपींकडून लुटीतील पाच लाख २५ हजारांच्या राेकडसह सहा लाख ८५ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.भिवंडी नाशिक राेडवरील मिल्लत नगर भागातील फळविक्रेते रियाज पठाण (५१) हे १२ एप्रिल २०२५ राेजी रिक्षाने खारेगाव टाेल नाक्याकडून मुंब्य्राच्या दिशेने जाणाऱ्या राेडवरुन जात हाेते. ते कळव्यातील आरएमसी प्लॅन्ट भागात आले असता, माेटारसायकलीवरुन आलेल्या चार सशस्त्र लुटारुंच्या टाेळक्याने त्यांच्या रिक्षाचा पाठलाग केला. या रिक्षाला खारेगाव टाेलनाका ते मुंब्य्राकडे जाणाऱ्या निर्जन रस्त्यावर गाठून पठाण यांना चाकू आणि रिव्हाॅल्व्हरचा धाक दाखवून त्यांच्याकडील १३ लाखांची राेकड लुटून पलायन केले हाेते. याप्रकरणी कळवा पाेलीस ठाण्यात दराेडयाचा गुन्हा दाखल झाला हाेता. पाेलीस उपायुक्त सुभाष बुरसे आणि सहायक पाेलीस आयुक्त उत्तम काेळेकर यांच्या आदेशाने वरिष्ठ पाेलीस निरीक्षक अशाेक उतेकर यांनी या तपासासाठी एक पथक तयार केले.

सहायक पेालीस िनरीक्षक ज्ञानेश्वर धाेडे यांच्या पथकाने १०० पेक्षा अधिक सीसीटीव्हींची पडताळणी केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फैजानअली अन्सारी (४१, रा. भिवंडी, ठाणे) याला अटक केली. पठाण यांची रिक्षा पाच जणांच्या टाेळक्याने मुंब्य्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर निर्जनस्थळी गाठून त्याच्याकडील १३ लाखांची राेकड लुटल्याची कबूली चाैकशीमध्ये दिली. अन्सारी याच्यासह विवेक वाघमाेडे आणि मयूर पाटील अशा तिघांनाही यामध्ये अटक करण्यात आली. त्यांच्याकडून लुटीसाठी वापरलेल्या एक लाख ६० हजारांच्या दाेन माेटारसायकली आणि राेकड असा पाच ल ाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRobberyचोरी