शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार : विधिसंघर्षग्रस्त बालकासह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 8:05 PM

कामठी-कळमना मार्गावर निर्जनस्थळी मित्रासोबत गप्पा मारत असलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी विधिसंघर्षग्रस्त बालकासह तिघांना अटक केली आहे.

ठळक मुद्देनागपूरनजीकच्या कामठी-कळमना मार्गावरील घटनाचाकूचा धाक दाखवीत मारहाण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर (कामठी) : कामठी-कळमना मार्गावर निर्जनस्थळी मित्रासोबत गप्पा मारत असलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी विधिसंघर्षग्रस्त बालकासह तिघांना अटक केली आहे. मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचा जिल्ह्यात सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी राणी सती सोसायटी, कळमना येथील अकराव्या वर्गात शिकणाऱ्या तिच्या वर्गमित्रासोबत कामठी-कळमना मार्गावरील लक्की बारच्या बाजूने रात्री ८.३० वाजताच्या सुमारास गप्पा मारत असताना कामठी परिसरातील तीन अज्ञात आरोपी तोंडाला कापड बांधून त्यांच्याजवळ आले. त्यांनी मुलगी आणि तिच्या मित्राला चाकूचा धाक दाखवून नजीकच्या झुडपात नेले. तिथे दोघांनाही निर्वस्त्र करण्यात आले. यानंतर तिन्ही आरोपींनी अल्पवयीन तरु णीच्या गळ्यावर चाकू लावून तिच्यावर पाशवी बलात्कार केला. यातील दोन आरोपींनी पीडित मुलीच्या वर्गमित्राला लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यासोबतच त्याच्याजवळील पाच हजार रु पये किमतीचा मोबाईल व मुलीच्या हातातील चांदीची अंगठी असा मुद्देमाल घेऊन तिन्ही आरोपी कामठीच्या दिशेने पसार झाले.अल्पवयीन मुलगी व मुलाने आरोपी पसार झाल्यानंतर लागलीच कळमना पोलीस स्टेशन गाठले. कळमना पोलिसांनी घटनास्थळ नवीन कामठी पोलीस स्टेशन येत असल्याचे सांगत, नवीन कामठी पोलीस स्टेशनला जाऊन तक्र ार करण्यास सांगितले. यानंतर या दोघांनी नवीन कामठी पोलीस स्टेशन गाठून रात्री १० वाजताच्या सुमारास नवीन कामठी पोलीस स्टेशनला तक्र ार दाखल केली. पोलिसांनी तातडीने याची दखल घेत रात्रीच घटनास्थळ गाठत आरोपींच्या शोधात परिसर पिंजून काढला. परंतु तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी कलम ३७६ (ड), ३९२, ३२४, ३४ भादंवि पोक्सो २०१२ (बाललैंगिक संरक्षण कायद्यानुसार) गुन्हा दाखल करीत पीडिताला वैद्यकीय चाचणीसाठी मेयो रुग्णालयात दाखल केले.२० तासात अटकपीडितेच्या बयानावरून पोलिसांनी तपासचक्रे वेगात हलविली. याप्रकरणी मोहनिस ऊर्फ मिलिंद बोरकर (२६) रा. रमानगर, रेल्वे फाटकजवळ, हुकला ऊर्फ शेख अमीन (३२) रा. अब्दुल्ला शाह बाबा दर्गा परिसर कामठी आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला २० तासात अटक केली. उपरोक्त कारवाई पोलीस उपायुक्त नीलोत्पल, सहायक पोलीस आयुक्त राजरतन बनसोड, नवीन कामठीचे ठाणेदार संतोष बकाल, दुय्यम पोलीस निरीक्षक राधेशाम पाल यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकातील हेड कॉन्स्टेबल पप्पू यादव, मंगेश लांजेवार, मंगेश यादव, राजेंद्र टाकळीकर, सतीश ठाकूर, सुधीर कनोजिया, उपेंद्र कोटकर आदींनी केली.अल्पवयीन मुलगी व मुलाने आरोपी पसार झाल्यानंतर लागलीच कळमना पोलीस स्टेशन गाठले. कळमना पोलिसांनी घटनास्थळ नवीन कामठी पोलीस स्टेशन येत असल्याचे सांगत, नवीन कामठी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करण्यास सांगितले. यानंतर या दोघांनी नवीन कामठी पोलीस स्टेशन गाठून रात्री १० वाजताच्या सुमारास नवीन कामठी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारnagpurनागपूर