शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबातील चौघांची केली हत्या; त्यापैकी एकाचा मृतदेह घेऊन पोचला पोलिसात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 20:56 IST

या घटनेमुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ माजली होती.

ठळक मुद्दे तीन मृतदेह ३५० किमी अंतरावर असलेल्या अपार्टमेंटमध्ये ठेवून आला होता. त्याने या हत्या का केल्या? हे अद्याप कळू शकलेले नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

सॅन फ्रॅन्सिस्को - अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला पोलिसांनी चार जणांच्या हत्येप्रकरणी जेरबंद केले आहे. शंकर नागप्पा हांगुड (५३) असं या आरोपीचं नाव आहे. हा इसम आपल्या गुन्ह्याची कबुली देण्यासाठी नॉर्थन कॅलिफोर्निया पोलीस ठाण्यात कारमधून एक मृतदेह घेऊन गेला होता. तर तीन मृतदेह ३५० किमी अंतरावर असलेल्या अपार्टमेंटमध्ये ठेवून आला होता. या घटनेमुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ माजली होती.शंकरने आपल्याच कुटुंबातील चार जणांची हत्या केली. हत्या करून त्यातील एक मृतदेह तो सोमवारी दुपारी पोलीस ठाण्यात कबुली देण्यासाठी कारमधून घेऊन गेला. पोलीस ठाण्यात पोहोचून त्याने आपण चार जणांची हत्या केली असल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांना त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. यानंतर तो जी कार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला होता, पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्यांना त्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. रोजव्हीला शहरातील अपार्टमेंट शंकरने कुटुंबातील चौघांची हत्या केली. आयटी प्रोफेशनल असलेल्या शंकरने या हत्या का केल्या याचा पोलीस तपास करत आहेत.  पोलिसांनी त्याच्या घराची तपासणी केली असता पोलिसांना आणखी तीन मृतदेह आढळले. त्यामध्ये एक मृतदेह हा एका प्रौढ व्यक्तीचा तर दोन मृतदेह हे लहान मुलांचे असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी शंकर याला अटक केली असून त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे. त्याने या हत्या का केल्या? हे अद्याप कळू शकलेले नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :AmericaअमेरिकाCaliforniaकॅलिफोर्नियाPoliceपोलिसMurderखून