शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

देवांच्या नावाने व्हॉट्सअप ग्रुप बनवून सट्टेबाजी, जयपूरमध्ये चौघांना अटक; ४.१८ कोटींची रोकड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 07:06 IST

एक लाखासाठी ‘किलो’ आणि एका कोटीसाठी ‘चिकन’ या नावाचा वापर केला जायचा. ऑनलाईनवरील सट्ट्यापैकी उघडकीस आलेला हा मोठा सट्टा होय, असा दावा जयपूर पोलिसांनी केला. सध्या दुबईत आयपीएल किक्रेट स्पर्धा खेळली जात आहे.

जयपूर : देवी-देवतांच्या नावे व्हॉट्सअप ग्रुप तयार करून सांकेतिक भाषेत आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या बुकींच्या टोळाची जयपूर पोलिसांनी पर्दाफाश केला.  पोलिसांनी ४.१८ कोटींच्या रोकडसह चार जणांना जेरबंद केले. 

एक लाखासाठी ‘किलो’ आणि एका कोटीसाठी ‘चिकन’ या नावाचा वापर केला जायचा. ऑनलाईनवरील सट्ट्यापैकी उघडकीस आलेला हा मोठा सट्टा होय, असा दावा जयपूर पोलिसांनी केला. सध्या दुबईत आयपीएल किक्रेट स्पर्धा खेळली जात आहे. त्या पार्श्वभूमी सट्टेबाजीतील संघटित टोळीबाबत जयपूर पोलीस आयुक्तांचे विशेष पथक गेल्या दोन आठवड्यांपासून माहिती गोळा करीत होते. त्यानंतर पोलिसांनी एका निवासी संकुलावर धाड टाकून रणधीर सिंह (राजकोट) आणि कृपाल सिंह जोधा ऊर्फ अंकित जोधा (अजमेर) यांना अटक केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून अन्य बड्या सट्टेबाजांची नावे समोर आली आहेत. पोलिसांनी १९ मोबाईल फोन, नोटा मोजण्याची दोन यंत्रेही जप्त केली आहेत.

सूत्रधार राजेश राजकोट...या ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजीचा सूत्रधार राजेश राजकोट असून तो दुबईतून भारतातील अनेक राज्यांत डायमंड एक्स्चेंज डॉट कॉम वेबसाईटवर आयडी पासवर्डच्या माध्यमातून सट्टेबाजी करायचा, असे जयपूरचे पोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी सांगितले. सट्टेबाजीतून झालेल्या अवैध कमाईच्या पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी आरसी इंटरप्राईज या नावाने एक बँकिंग कंपनी स्थापन करण्यात आली होती. या कंपनीच्या जयपूर, अहमदाबाद, सुरत, वडोदरा, भावनगर, मुंबई, कच्छ, जुनागढसह जवळपास ३२१ शाखा आहेत. 

टॅग्स :Satta Bazarसट्टा बाजारPoliceपोलिसRajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी