शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

Sanoj Mishra : मोनालिसाला चित्रपटाची ऑफर देणारा दिग्दर्शक सनोज मिश्राला अटक, बलात्काराचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 12:27 IST

Sanoj Mishra : महाकुंभातून व्हायरल झालेल्या मोनालिसाला चित्रपटाची ऑफर देणारा दिग्दर्शक सनोज मिश्राला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

महाकुंभातून व्हायरल झालेल्या मोनालिसाला चित्रपटाची ऑफर देणारा दिग्दर्शक सनोज मिश्राला दिल्लीपोलिसांनी अटक केली आहे. सनोज मिश्रावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने सनोज मिश्राचा जामीन फेटाळला होता, त्यानंतर दिल्लीच्या नबी करीम पोलीस ठाण्याने त्याला अटक केली आहे.

सनोज मिश्रावर एका छोट्या शहरातून आलेल्या आणि हिरोईन होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार,  २०२० मध्ये टिकटॉक आणि इन्स्टाग्रामद्वारे तिची आरोपी चित्रपट दिग्दर्शकाशी ओळख झाली. त्यावेळी ती झाशी येथे राहत होती. दोघांमधील संभाषण काही वेळ चालू राहिलं आणि त्यानंतर दिग्दर्शकाने तिला १७ जून २०२१ रोजी फोन करून सांगितलं की तो झाशी रेल्वे स्टेशनवर आला आहे.

आत्महत्येची दिली धमकी

पीडितेने त्याला भेटण्यास नकार दिल्यावर आरोपी सनोज मिश्राने आत्महत्या करण्याची धमकी दिली. भीतीमुळे मुलगी त्याला भेटायला गेला. दुसऱ्या दिवशी, १८ जून २०२१ रोजी, आरोपीने तिला पुन्हा फोन करून रेल्वे स्टेशनवर बोलावलं आणि धमकी दिली. त्यानंतर आरोपीने तिला एका रिसॉर्टमध्ये नेलं आणि अमली पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ बनवले आणि विरोध केल्यास ते सार्वजनिक करण्याची धमकी दिली.

अनेक वेळा केली मारहाण

आरोपीने यानंतर तिला लग्नाच्या बहाण्याने अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी बोलावलं आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यासोबतच त्याने तिला चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवलं. या आशेने पीडिता मुंबईत आली आणि आरोपींसोबत राहू लागली, पण तिथेही आरोपी तिचे शोषण करत राहिला आणि तिला अनेक वेळा मारहाणही करत राहिला.

तीनदा गर्भपात करण्यास पाडलं भाग

पीडितेचा आरोप आहे की, आरोपीने तिला तीनदा गर्भपात करण्यास भाग पाडलं. फेब्रुवारी २०२५ मध्ये, आरोपीने तिला सोडून दिलं आणि जर तिने काही तक्रार केली तर तो तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करेल अशी धमकी दिली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdelhiदिल्ली