शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील फॅशन डिझायनरचे व्हॉट्सअ‍ॅप हॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 06:22 IST

सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; मैत्रिणीच्याही बनावट फेसबुकचा वापर

मनीषा म्हात्रे 

मुंबई : देशभरात व्हॉट्सअ‍ॅप हेरगिरी प्रकरण गाजत असताना, मुंबईतील एका २८ वर्षीय फॅशन डिझायनरचे व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. फेसबुकवरून मैत्रीण बोलत असल्याचे भासवून तरुणीचा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक आणि ओटीपी क्रमांक मिळवला. पुढे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे अश्लील व्हिडीओ शेअर केले. या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार फॅशन डिझायनर सायन परिसरात कुटुुंबासह राहते. ३ नोव्हेंबर रोजी मैत्रिणीच्या फेसबुकचा वापर करत तिच्याशी चॅटिंग सुरू झाले. मैत्रीणच बोलत असल्याचे भासवून तरुणीचा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक आणि ओटीपी क्रमांक घेतला. काही वेळाने तिच्या व्हॉट्सअ‍ॅपद्वारे अश्लील व्हिडीओ शेअर झाले. ते पाहून तरुणीला धक्का बसला. तिने मैत्रिणीकडे याबाबत विचारले, मात्र तिला काहीच माहीत नव्हते. दोघींनाही तो व्हिडीओ पाहून धक्का बसला. त्यांनी थेट सायन पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आयटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यात तिच्या मैत्रिणीच्याही बनावट फेसबुक खात्याचा यात वापर करण्यात आला होता. संबंधित व्यक्ती कोण आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. यामागे आॅनलाइन ठग आहे की अन्य कुणाचे षड्यंत्र आहे, आदींबाबत पोलीस तपास करत आहेत. तांत्रिक पुराव्याच्या आधारे सायन पोलीस ठाण्याचे सायबर पथक अधिक तपास करत आहे.अद्याप अटक नाही, अधिक तपास सुरूया प्रकरणी नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दाखल तक्रार तसेच उपलब्ध माहितीच्या आधारे अधिक तपास सुरू असल्याची माहिती सायन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्ष्ज्ञक (गुन्हे) संजय पोपळघट यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप