शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 06:18 IST

- जितेंद्र कालेकर लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : काैटुंबिक कलहामुळे अनेकवेळा मुलांना घरात मारहाणीच्या घटना ठाणे शहर आयुक्तालयाच्या क्षेत्रात घडल्या ...

- जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : काैटुंबिक कलहामुळे अनेकवेळा मुलांना घरात मारहाणीच्या घटना ठाणे शहर आयुक्तालयाच्या क्षेत्रात घडल्या आहेत. बदलापुरात एका कुटुंबीयांशी झालेल्या वादातून मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने नुकतीच अटक केली. तर, मुंब्य्रात पहिल्या पतीपासून विभक्त झालेल्या महिलेने केवळ मोबाइलसाठी स्वत:च्याच अल्पवयीन मुलीला स्टीलच्या उलथण्याने अमानुष मारहाण केल्याचाही प्रकार समोर आला. केवळ क्षुल्लक कारणासाठी संतापाच्या भरात या मुलीला अमानुषपणे मारहाण झाली. या दोन्ही घटनांचा तपास करणाऱ्या पोलिसांनीही या क्रूरतेबद्दल खेद व्यक्त केला.

बदलापूरच्या रामटेकडी भागातील एका मजूर कुटुंबातील चार वर्षांच्या मुलीच्या अपहरणाची तक्रार बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात २४ जूनला दाखल झाली होती. उल्हासनगरचे पोलिस उपायुक्त सचिन गोरे आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेने केलेल्या तपासात एका रिक्षातून या मुलीला रंजित धुर्वे याने रेल्वे स्टेशनच्या दिशेने नेल्याची माहिती एका महिलेकडून मिळाली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उल्हासनगर युनिट ४ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी आणि सहायक पोलिस निरीक्षक श्रीरंग गोसावी यांच्या पथकाने मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील उमरेठ गावातून २५ जूनला रंजितला ताब्यात घेतले. मुलीच्या कुटुंबीयांशी आदल्या दिवशी झालेल्या वादातून हा अघोरी प्रकार केल्याची कबुली त्याने दिली. त्याला या मुलीच्या आईने जेवण न दिल्याचा रागही त्याच्या डाेक्यात हाेता. यातून ताे मुलीला थेट मध्य प्रदेशातील त्याच्या बहिणीकडे साेपविणार हाेता, असेही त्याने सांगितले.

मोबाइल सायलेंटवर गेल्याने चोप दुसऱ्या घटनेत साडेचार वर्षांच्या मुलीने मोबाइल घेतल्याने तो सायलेंटवर गेल्याच्या रागातून तिला स्टीलच्या उलथण्याने अमानुष मारहाण करणाऱ्या आईविरोधात मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुलीला जमिनीवर आपटून बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

त:च्याच मुलीला मारहाण करणारी ही महिला मुंबईतील वडाळा भागात पती, सासू आणि मुलीसह वास्तव्याला होती. ती काही महिन्यांपूर्वी त्याच भागातील दुसऱ्याच व्यक्तीसोबत दिव्यातील साबेगाव भागात वास्तव्याला आली. त्याच्याशी तिने लग्नही केले. काही दिवसांनी तिने तिच्या साडेचार वर्षांच्या मुलीलाही सोबत नेले. दरम्यान, ६ जुलैला सकाळी ११ च्या सुमारास या मुलीला उलथण्याने अमानुषपणे मारहाण होत असल्याची माहिती मुलीच्या आजीला मिळाली. त्याबाबतचे चित्रणही तिला मिळाले. 

मुलीची आईच तिला जमिनीवर आपटत तिचे केस ओढत बेदम मारहाण करीत होती. मुलीच्या सावत्र भावंडांनीही तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. १७ वर्षीय सावत्र भावाने व्हिडीओही काढला. हीच माहिती आजीकडून मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मुलीची तिच्या तावडीतून सुटका केली. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात सासूने सुनेविरोधात गुन्हा नोंदवला आहे. अनेकवेळा कुटुंबातील पती पत्नीच्या वादातूनही मुलांना नाहक मारहाण केली जाते. पालकांनी संयमाने मुलांशी वर्तणूक करणे अपेक्षित असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी