UP निवडणूक पराभवावरून डिवचलं; मीरा रोडमध्ये कुटुंबाला मारहाण अन् दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 09:18 PM2021-05-03T21:18:29+5:302021-05-03T21:18:58+5:30

Assaulting to Family : शाहजादच्या डोक्यावर टोकदार लोखंडी दांड्याने मारले. 

UP election defeat, family beaten and stoned in mira road | UP निवडणूक पराभवावरून डिवचलं; मीरा रोडमध्ये कुटुंबाला मारहाण अन् दगडफेक

UP निवडणूक पराभवावरून डिवचलं; मीरा रोडमध्ये कुटुंबाला मारहाण अन् दगडफेक

Next
ठळक मुद्देकुटुंबियांना बेदम मारहाण करण्यासह दगसफेक व तोडफोडीची घटना काशीमीराच्या मुन्शी कंपाउंडमध्ये घडली आहे. 

मीरारोड - शेजारी राहणाऱ्यास त्याचा मामा उत्तर प्रदेशातील पंचायतीच्या निवडणुकीत हरल्यावरून डिवचल्याने संतप्त नातलगांनी डिवचणाऱ्या इसमासह त्याच्या कुटुंबियांना बेदम मारहाण करण्यासह दगसफेक व तोडफोडीची घटना काशीमीराच्या मुन्शी कंपाउंडमध्ये घडली आहे. 

मकसूद चाळीत राहणाऱ्या मोहम्मद हारुण हासमतअली शाह ( ४८ ) हा रविवारी रात्री घरा जवळच जमीर, याकुब राईन, हारुण यांच्यासह गप्पा मारत होता. त्यावेळी शाहने याकूबला, उत्तरप्रदेशच्या गाव प्रधानाच्या निवडणुकीत तुझा मामा कसा हरला ? असे डिवचले. त्याचा राग येऊन याकूबने शिवीगाळ करत मारहाण सुरु केली.  त्यावेळी जमीर व हारुण सोडवले. 

पण  त्यानंतर देखील याकूब शिवीगाळ करत असल्याने शाह यांचा मुलगा समीम आला व त्याने जाब विचारला. त्या वेळी भांडणाचा आवाज ऐकून याकूबचे नातलग सर्फराज राईन, ईजाज राईन, युसुफ राईन हे आले व त्यांनी शाह सह त्यांचे मुलगे समीम, सलीम , वसीम व शहजाद ह्यांच्यवर जबर हल्ला चढवला. शाहजादच्या डोक्यावर टोकदार लोखंडी दांड्याने मारले. 

जखमी अवस्थेत शाह व त्यांची मुले पळू लागली असता त्यांच्यावर दगडफेक केली .  शाह मुलांसह घरात लपले असता त्यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फोडुन, दरवाज्याच्या जाऴीचा पाईप तोडला . घरावर दगड फेकले . शाह कुटुंबाच्या घराबहर असलेल्या दोन दुचाकींची तोडफोड केली . पोलीस आल्याने हल्लेखोर पळून गेले . सोमवारी शाह यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी याकूब राईन सह सर्फराज , इजाज व युसूफ विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .

Web Title: UP election defeat, family beaten and stoned in mira road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.