शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर की हैवान! २० वर्षीय तरुणीचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची दिली धमकी 

By पूनम अपराज | Updated: October 30, 2020 19:35 IST

Molestation : आयजोलच्या रामहलून उत्तर येथील रहिवासी जे.एच. वानलालनुनमाविया असे आरोपीचे नाव असून तो सध्या साकरदाई गावात डॉक्टर म्हणून कार्यरत आहे.

ठळक मुद्दे लालझावमलियाना पुढे म्हणाले की, आरोपीने २० व्या वर्षाच्या महिलेचा विनयभंग केला आणि विनंती मान्य केली नाही तर तिला जिवे मारण्याची धमकी दिली. 

आयजोलपासून १६१ किलोमीटर अंतरावर असलेल्या मणिपूरच्या सीमेवरील मिझोरमच्या ईशान्य भागात साकरदाई गावाजवळ एका २९ वर्षीय डॉक्टरलाविनयभंग करून तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.आयजोलच्या रामहलून उत्तर येथील रहिवासी जे.एच. वानलालनुनमाविया असे आरोपीचे नाव असून तो सध्या साकरदाई गावात डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. नुकताच घडलेल्या या घटनेची माहिती पीडितेच्या कुटूंबाने साकरदाई पोलिस स्टेशनमध्ये देतफौजदारी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस ठाण्याचे प्रभारी लालझावमलियाना यांनी दिली. पोलिसांनी सांगितले की, ही घटना सोमवारी रात्री घडली,  पीडित एक स्वयंसेवी संस्थेअंतर्गत काम करते, ती आपल्या जन्मगावाच्या दिशेने  डॉक्टरांच्या गाडीने साकरदाईकडे जात असताना ही घटना घडली.लालझावमलियाना पुढे म्हणाले की, आरोपीने २० व्या वर्षाच्या महिलेचा विनयभंग केला आणि विनंती मान्य केली नाही तर तिला जिवे मारण्याची धमकी दिली. या आरोपीला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली आणि त्याला बुधवारी आयजल येथे दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी विनयभंग, हत्या करण्याचा प्रयत्न आणि दारूच्या नशेत वाहन चालविण्याचे आरोप डॉक्टराविरूद्ध लादले आहेत, असे पोलीस अधिकाऱ्याने  सांगितले.जिल्हा कोर्टाने गुरुवारी डॉक्टरची जामीन याचिका फेटाळल्याने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, मिझोरमची सर्वोच्च महिला संस्था मिझो ह्मेची इंसुइहखॉम पावल (एमएचआयपी), साकरदाई  आणि हमार स्टुडंट्स असोसिएशनच्या (एचएसए) स्वयंसेवी संस्थांनी या घटनेचा निषेध केला आहे आणि आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. एचएसएने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आरोपीने प्रक्षोभक जातीय टिपण्णी वापरली आणि त्याच्याकडे माफी मागितली आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसArrestअटकdoctorडॉक्टर