शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
2
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
3
चार कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही; व्हायरल पोस्टनंतर सरकारने सांगितलं सत्य 
4
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
5
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
6
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
7
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
8
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
9
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
10
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
11
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
12
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
13
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
14
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
15
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
16
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
17
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
18
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
19
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
20
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
Daily Top 2Weekly Top 5

सुपारी पडली महागात, ढोल ताशा पथकाला ठेवले होते डांबून; १५ मुलींसह ६० जणांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 21:22 IST

Crime News : स्वामी ओम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शुभंकर वायचळ यांनी सांगितले की, एका इव्हेंट कंपनीच्या प्रेमानंद यादव यांनी सिकंदराबाद परिसरात ढोल ताशा वादनाची ४ लाख रुपयांची सुपारी दिली होती.

पुणे : चार दिवसाच्या वादनासाठी सुपारी घेऊन गेलेल्या पुण्यातील स्वामी ओम प्रतिष्ठानच्या ६० जणांच्या पथकाला हैदराबाद येथे डांबून ठेवण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांनंतर शनिवारी दुपारी पोलिसांच्या मदतीने या पथकाची सुटका झाली. सायंकाळी ते पुण्याकडे निघाले आहेत.

याबाबत स्वामी ओम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शुभंकर वायचळ यांनी सांगितले की, एका इव्हेंट कंपनीच्या प्रेमानंद यादव यांनी सिकंदराबाद परिसरात ढोल ताशा वादनाची ४ लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यानुसार आम्ही १६ मुलीसह ६० जणांचे पथक १५ सप्टेंबर रोजी पुण्यातून निघालो. १६ सप्टेंबर रोजी तेथे पोहचलो. हैदराबाद, सिकंदराबाद येथे १६, १७, १८ व १९ सप्टेंबर रोजी वेगवेगळ्या छोट्या मोठ्या गावांमध्ये गणपतीसमोर वादन केले. त्यानंतर त्यांनी आणखी ३ दिवस वादन करण्याची गळ घातली. त्यानुसार आम्ही आणखीन तीन दिवस वेगवेगळया ठिकाणी वादन केले. 

आपल्याकडे गणपती उत्सव १० दिवस असतो. तिकडे १५ दिवस साजरा केला जातो. २२ सप्टेंबर रोजी वादन केल्यानंतर आम्ही २३ सप्टेंबरला परत पुण्यात येण्यास निघाल्यावर यादव व इतरांनी मला व प्रणव यांना जेवायला घेऊन गेले. जेवण झाल्यावर त्यांनी परत कसे जाणार असे विचारुन आमच्या गाडीच्या चालकाकडून परमिटची फाईल घेतली. त्यानंतर त्यांनी आपला खरा चेहरा दाखवत आणखी तीन दिवस वादन करा. त्याशिवाय सोडणार नाही, असे म्हणाले. 

आमच्याबरोबरच्या मुलींनाही त्यांनी शिवीगाळ केली. शुक्रवारी रात्री त्यांच्याबरोबर भांडणे झाली. तरी ते सोडायला तयार नव्हते. शेवटी पुण्यातील मनसेच्या कार्यकर्त्या रुपाली ठोंबरे तसेच नितिन परदेशी यांच्यासह अनेकांना संपर्क केला. हैदराबाद येथील नगरसेविका पुजारी यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी मदत करुन पोलीस उपायुक्तांच्या कानावर ही बाब घातली. हैदराबाद पोलिसांनी आम्हाला मदत केली. त्यांच्याकडून २ लाख रुपये मिळवून दिले. त्यानंतर शनिवारी सायंकाळी आम्ही पुण्याकडे निघालो.

याबाबत रुपाली ठोंबरे यांनी सांगितले की, शनिवारी दुपारी या ढोल पथकाची माहिती मिळाली. त्यानंतर काही वेळातच हैदराबाद येथील राजाभाऊ ठाकूर यांना कळविले. त्यांनी व इतरांनी केलेल्या प्रयत्नानंतर काही तासात या मुलांची पोलिसांनी सुटका करुन त्यांना पुण्याकडे रवाना केले आहे.

पुण्यातील आणखी ढोल पथकाला होते निमंत्रण
स्वामी ओम प्रतिष्ठानसह पुण्यातील आणखी काही ढोल ताशा पथकांना निमंत्रण देण्यात आले होते, अशी माहिती समजते. मात्र, त्यातील काही जणांनी अगाऊ रक्कम दिली तरच येऊ असे सांगितल्याने ते गेले नाहीत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे