शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

'डेंग्यू झाला होता पण सुटी नाही मिळाली'.. डेअरी फार्ममध्ये CRPF ASI चा मृतदेह सापडल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 6:51 PM

CRPF ASI dead body found in dairy farm : डेअरी फार्ममध्ये मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी मृत सीआरपीएफ एएसआयचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

मथुरा - उत्तर प्रदेशातील मथुरा येथील बाजार पोलीस स्टेशन परिसरात एका सीआरपीएफ जवानाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. डेअरी फार्ममध्ये मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी मृत सीआरपीएफ एएसआयचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. दुसरीकडे, दुष्यंत मोहन यांना डेंग्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. रजा न मिळाल्याने तो नाराज होता.गुरुवारी, जिल्ह्यातील सदर बाजार पोलिस स्टेशनअंतर्गत असलेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या डेअरी फार्ममध्ये, सीआरपीएफमध्ये तैनात असलेल्या चंडीपुरा पोलिस स्टेशन सुरीरचे रहिवासी वासुदेव सहाय यांचा मुलगा दुष्यंत मोहन याचा मृतदेह आढळून आला. डेअरी फार्मच्या आवारात हा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. मृताच्या तोंडातून फेस व रक्त येत असल्याचे नातेवाइकांनी सांगितले.घटनेची माहिती मिळताच सीओ सिटी अभिषेक तिवारी हेही त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला. मृत सीआरपीएफचे एएसआय भगवान श्री कृष्ण जन्मस्थळी गेल्या अडीच वर्षांपासून कर्तव्यावर होते, असे सांगण्यात आले.डेंग्यूने त्रस्त होते, रजा मिळत नव्हतीमृत दुष्यंत मोहनचा लहान भाऊ वेदप्रकाश गौतम यांनी सांगितले की, मोठ्या भावावर उपचार सुरू होते. त्यांना डेंग्यूच्या आजाराने ग्रासले होते. त्याच्या युनिटमध्ये रजेसाठी अर्ज दिला होता. मात्र, त्याला रजा मिळू शकली नाही. सीआरपीएफमध्ये तैनात होते आणि रेडिओ ऑपरेटर होते. त्यांना सुटी दिली न गेल्याने विश्रांती मिळू शकली नाही.शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईलया प्रकरणाची माहिती देताना सीओ सिटी अभिषेक तिवारी यांनी सांगितले की, सीआरपीएफमध्ये तैनात असलेले दुष्यंत मोहन सुमारे 49 वर्षांचे होते, ते कृष्णा नगर येथील बँक कॉलनीमध्ये राहत होते. त्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. उद्यानात आवळा खाल्ल्याची चर्चा रंगली आहे. अचानक दुष्यंतच्या तोंडातून फेस येऊ लागला आणि त्याला उलटी झाली आणि तो पार्कमधील बाकावर झोपला गेला. मृत्यूचे कारण काय?, हे शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल, अहवाल येईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसDeathमृत्यूdengueडेंग्यू