Deepika left Goa for Mumbai, Mumbai police increased security outside her house | गोव्याहून मुंबईकडे दीपिका झाली रवाना, तिच्या घराबाहेर मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा

गोव्याहून मुंबईकडे दीपिका झाली रवाना, तिच्या घराबाहेर मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा

ठळक मुद्देदीपिका पादुकोणने गोवा सोडलं असून दीपिका गोव्याहून वाया रोड मुंबईला पोहोचू शकते. तथापि, अद्याप दीपिका चार्टर्ड प्लेनमार्गे किंवा रस्त्याने मुंबईला पोहोचेल हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे धागेदोरे ड्रग्ज प्रकरणाशी जोडले गेले आणि बॉलिवूडमधील दिग्गजांना आता एनसीबीच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण ही ड्रग्ज कनेक्शनमधील सर्वात दिग्गज व्यक्ती आहे. ती बॉलिवूडच्या ए-लिस्टर अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका पादुकोणवर 25 सप्टेंबर रोजी म्हणजेच उद्या ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून चौकशी केली जाईल. त्यामुळे दीपिका गोव्याहून मुंबईकडे येण्यास निघाली आहे. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेला धोका पोहचू नये म्हणून मुंबईपोलिसांनी तिच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला आहे.

दीपिका पादुकोणने गोवा सोडलं असून दीपिका गोव्याहून व्हाया रोड मुंबईला पोहोचू शकते. तथापि, अद्याप दीपिका चार्टर्ड प्लेनमार्गे किंवा रस्त्याने मुंबईला पोहोचेल हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिकाने एनसीबीच्या नोटीसला उत्तर देताना सांगितले की, ती उद्या चौकशीसाठी हजर राहील. तिच्या घराबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.


बॉलीवुडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोणचे सध्या बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन प्रकरणात नाव समोर आल्यापासून वादात सापडली आहे. दीपिका मुंबईत 12 लोकांच्या लीगल टीमशी व्हिडीओ कॉलने संपर्कात आहेत. दीपिकाचा पती अभिनेता रणवीर सिंग या टीमचा भाग आहे. एनसीबीने दीपिकाला 25 सप्टेंबरपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दीपिका आज(गुरुवारी) मुंबईत परत येऊ शकते अशी माहितीही समोर येत आहे.  गेल्या आठवड्यात दीपिका सध्या धर्मा प्रोडक्शनच्या सिनेमाचे गोव्यात शूटिंग करत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ड्रग्स प्रकरणातील चौकशीसाठी गोव्याहुन मुंबईला रवाना झाली आहे.सारा अली खान मुंबईत नसल्यामुळे एनसीबीने तिला 26 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलवले आहे. गोवा एअरपोर्टवर मीडियाचे कॅमेरे पाहताच साराने चेहऱा फिरवला. 25 सप्टेंबरला एनसीबी दीपिका पादुकोण आणि रकुल प्रीत सिंगची चौकशी करणार आहेत.ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत दीपिका पादुकोण, सारा अली खान,रकुल प्रीत सिंग, नम्रता शिरोडकर या बॉलिवूड सेलेब्सची नाव आली आहे. रियाने एनसीबीच्या चौकशीत सारा, श्रद्धा आणि रकुल प्रीत सिंग यांची नाव सांगितली आहेत. (Photo Instagram)सुशांतच्या फॉर्म हाऊसवर ड्रग्समध्ये सारा, श्रद्धा आणि रकुल प्रीत यांचा सहभाग असायचा अशी माहिती समोर येतेय.या अभिनेत्री ड्रग्ज मागवत असल्याची माहिती एनसीबीच्या हाती लागली आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

अश्लील व्हिडीओ बनवून केले जाते युवतींना ब्लॅकमेल, जबरदस्तीने ठेवले जात शारीरिक संबंध 

 

धक्कादायक! पतीचा पत्नीने कंटाळून काढला काटा, मृतदेह दोन दिवस ठेवला बेडमध्ये लपवून 

 

पूनम पांडे विनयभंग प्रकरण : सॅम बॉम्बे सध्या झिजवतोय पोलीस ठाण्याचे उंबरठे

 

Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया 

Read in English

Web Title: Deepika left Goa for Mumbai, Mumbai police increased security outside her house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.