शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
3
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
5
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
6
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
7
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
8
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
9
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
10
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
11
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
12
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
13
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
14
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
15
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
16
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
17
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
18
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
19
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
20
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
Daily Top 2Weekly Top 5

'तारीख पे तारीख' संपणार, जामीन अर्जांचा खोळंबा टळणार! सर्वोच्च न्यायालयाचा हायकोर्टांना मोठा दणका; २ आठवड्यांत सुनावणीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 09:07 IST

Supreme Court Guideline on Bail Applications:

ॲड. डॉ. उदय प्रकाश वारुंजीकर
ज्येष्ठ वकील, मुंबई उच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालयात एकूण ३४ न्यायमूर्ती असून, आता आणखी ४ नवीन पदे निर्माण होणार आहेत. दुसरीकडे २५ उच्च न्यायालयांमध्ये एकूण १,१२२ पदे मंजूर आहेत. पण त्यामध्ये सुमारे ३० टक्के जागा रिक्त आहेत. जिल्हा पातळीवरील मंजूर न्यायाधीशपदांची संख्या २५,८९४ असून, सुमारे ५०० पदे रिक्त आहेत. जिल्हा न्यायाधीशांनी जामीन अर्ज कशा पद्धतीने चालवावेत, यासह अनेक मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाने विविध आदेश दिले आहेत. पण उच्च न्यायालयातील प्रलंबित जामीन अर्जांकडे दुर्लक्ष होते. या सुनावणीत व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि समाजाचे प्रश्न हे न्यायालयीन तराजूमध्ये तोलणे आवश्यक असते. व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेऊन आरोपीला तुरुंगामध्ये ठेवायचे की नाही, हा प्रश्न न्यायाधीशांपुढे असतो. जिल्हा न्यायाधीशांनी जामीन फेटाळल्यावर आरोपीला उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागते आणि मग अडथळ्यांची शर्यत सुरू होते.

जिल्हा न्यायालयात एखाद्या दिवशी सुनावणी न झाल्यास पुढील तारीख दिली जाते आणि त्यादिवशी अर्ज न्यायालयापुढे येतो. पण उच्च न्यायालयात पुढील तारखेला प्रकरण न्यायालयासमोर येईलच, याची खात्री नसते. अनेक प्रकरणांत पहिली सुनावणी लवकर होत नाही व ती कधी होईल, याचा अंदाज नसतो. दुसरीकडे सरकारी वकिलांवर प्रकरणाची प्रत बजावण्याबाबत वेगवेगळी पद्धत बघायला मिळते. न्यायालयामध्ये असणाऱ्या सरकारी वकिलांवर की संबंधित पोलिस ठाण्यात प्रकरणाची प्रत देऊन नोटीस बजावावी, असे प्रश्न येतात. मग ‘तारीख पे तारीख’ चालू होते. कधी तपास अधिकारी नसतो, तर कधी अर्जाची प्रत न दिल्याचे कारण दिले जाते. त्यामुळे आरोपी तुरुंगामध्येच राहतो आणि सुनावणीची वाट बघतो.

असा वाचेल वेळ
जामीन अर्ज दोन-तीन वर्षे प्रलंबित राहत आहेत. फौजदारी याचिकाही मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असल्याने सर्वोच्च न्यायालयाला उच्च न्यायालयांसाठी आदेश जारी करावा लागला. 
प्रत्येक जामीन अर्ज एक-दोन आठवड्यांत सुनावणीसाठी आला पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्याचा फायदा अनेक नवीन व जुन्या प्रकरणांमध्ये होऊ शकतो. 
प्रथम सुनावणीआधी केसच्या परिस्थितीविषयीचा अहवाल सरकारी वकिलांनी सादर केला पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटल्याने तारखा पडणार नाहीत. 
महाधिवक्ता कार्यालयात म्हणजे राज्य सरकारसाठी प्रत्येक प्रकरणाची प्रत बजावणे बंधनकारक केल्याने यावरून होणारा वाद टळून वेळ वाचू शकतो.

कोरोना काळात काय झाले?
नव्याने दाखल झालेली प्रकरणे एका आठवड्यात आणि ज्या प्रकरणांना तारीख दिलेली नाही, ती सर्व प्रकरणे न्यायालयापुढे येण्याची परस्पर व्यवस्था करावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. 
आता उच्च न्यायालयातील प्रलंबित जामीन प्रकरणांना गती मिळण्याची आशा आहे. कोरोना काळात फक्त फौजदारी प्रकरणांवर अधिक सुनावण्या झाल्या. त्यावेळी उच्च न्यायालयाने सर्व न्यायमूर्तींना जामीन अर्जांचे काम वाटून सुमारे दोन हजार जामीन अर्जांवर न्यायनिवाडा केला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Supreme Court Cracks Down, Speeds Up Bail Hearings in High Courts

Web Summary : The Supreme Court has directed High Courts to prioritize bail hearings, aiming to clear backlogs. Orders mandate faster listing and reporting to expedite justice for those awaiting trial, addressing delays caused by procedural issues and vacancies in judicial positions.
टॅग्स :Courtन्यायालय