शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! चोरीचा आळ घेऊन दलित तरुणांना मारहाण, गुप्तांगामध्ये टाकले पेट्रोल आणि स्क्रूड्रायव्हर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 15:48 IST

Rajasthan : जातीव्यवस्थेमधून होणाऱ्या अत्याचारांचे अजून एक भयाण उदाहरण समोर आले आहे.

ठळक मुद्देजातीव्यवस्थेमधून होणाऱ्या अत्याचारांचे भयाण रूप राजस्थानमध्ये दिसून आलेनागौरमध्ये  चोरीच्या आरोपाखाली दोन दलित तरुणांना अमानूष मारहाण करून त्यांच्या प्रायवेट पार्टमध्ये पेट्रोल आणि स्क्रूड्रायव्हर टाकल्याचा प्रकार समोर आलाया प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये 7 जणांचा समावेश असून, यापैकी पाच जणांना अटक

जयपूर - जातीव्यवस्थेमधून होणाऱ्या अत्याचारांचे भयाण रूप राजस्थानमध्ये दिसून आले आहे. येथील नागौरमध्ये  चोरीच्या आरोपाखाली दोन दलित तरुणांना अमानूष मारहाण करून त्यांच्या प्रायवेट पार्टमध्ये पेट्रोल आणि स्क्रूड्रायव्हर टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. या मारहाणीवरून राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाले असून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. तसेच या घटनेतील दोषी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची सूचना त्यांनी राजस्थान सरकारला केली आहे.  सोशल मीडियावर या मारहाणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीचा आहे. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने या प्रकाराला वाचा फुटली आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुण स्वत:च्या बचावासाठी गयावया करत आहेत. तसेच मारहाण करणाऱ्यांची माफी मागत आहेत. मात्र आरोपींकडून कुठलीही दयामाया न दाखवता त्यांना मारहाण करण्यात येत आहे. दरम्यान, हा प्रकार उघड झाल्यानंतर राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने काँग्रेसवर टीका केली आहे. 

  राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातीली पांचौडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात हा प्रकार घडला आहे. येथील करणू सर्विस सेंटरमध्ये चोरी केल्याचा आरोप दोन तरुणांवर ठेवण्यात आला. त्यानंतर या सर्विस सेंटरमधील कर्मचाऱ्यांना या तरुणांना मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 342, 323, 341, 143 आणि एसी/एटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करून घेतला आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये 7 जणांचा समावेश असून, यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नागौरचे एएसपी राजकुमार आणि डीएसपी मुकुल शर्मा करत आहेत.  

संबंधित बातम्या

संतापजनक! दलित तरुणाला मारहाण करून मुत्रप्राशन करण्यास भाग पाडले 

दोन दलित अल्पवयीनांची जमावाने केली हत्या

कायद्याने नष्ट केलेली जातिव्यवस्था समाजव्यवस्थेत कायम!दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, नागौरचे खासदार हनुमान बेनिवाल यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानSC STअनुसूचित जाती जमाती