शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

भार्गवी मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 15:32 IST

पंतनगर पोलिसांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देभार्गवीच्या मृत्यूस जबाबदार रुग्णालयातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. घाटकोपर पूर्व येथील रमाबाई कॉलनीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भीम आर्मीतर्फे निदर्शने करण्यात आली.

मुंबई - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकणारी भार्गवी दुपारे (१८) हिचा १३ जून रोजी मुंबईतील सपना रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेस पाच महिने उलटूनही तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. भार्गवीच्या मृत्यूस जबाबदार रुग्णालयातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. रुग्णालय बंद करण्यात यावे, या मागणीसाठी घाटकोपर पूर्व येथील रमाबाई कॉलनीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भीम आर्मीतर्फे निदर्शने करण्यात आली. पंतनगर पोलिसांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

१३ जून रोजी सकाळी १० वाजल्यापासून सलग ८ दिवसांचे डॉक्टरांचे मोबाइल रेकॉर्ड तपासण्यात यावे. रुग्णालयाचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात यावे. भार्गवीच्या मृत्यूचा तपास गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्यात यावा. भार्गवीच्या कुटुंबीयांना २ कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी़ कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या. भार्गवीच्या वडिलांनी संगितले, पंतनगर पोलिसांवर माझा विश्वास नाही. या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करण्यात यावा. दोषी डॉक्टरांना अटक करण्यात यावी. पंतनगर पोलीस ठाण्यातील फौजदारांना निलंबित करण्यात यावे. घाटकोपर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त कुंडलिक निगडे यांनी संगितले, भार्गवीच्या कुटुंबीयांचा जबाब आम्ही नोंदवला आहे. वैद्यकीय अहवाल व शवविच्छेदन अहवालानुसार तपास सुरू आहे. कुटुंबीयांचे दावे व मागण्या लक्षात घेता गरज पडल्यास पुढील तपास सीआयडीकडे सोपवला जाईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGhatkoparघाटकोपरBhim Armyभीम आर्मीagitationआंदोलनMumbaiमुंबईPoliceपोलिस