शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरतेचा कळस! महिलेने साफसफाई करणं न थांबवल्याने केली बेदम मारहाण अन् छाटली जीभ

By पूनम अपराज | Updated: October 17, 2020 21:03 IST

Crime News : याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकाला अटक करण्यात आली आणि एक फरार आहे.

ठळक मुद्दे गोसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत आशापूर सरैया गावातील सुनिता वर्मा आपल्या घरासमोर धान्य ठेवण्यासाठी जागेची साफसफाई करत होती.

क्षुल्लक कारणावरून झालेला वाद पेटला. तो वाद मारहाण आणि अगदी जीव घेण्यापर्यंत पोहोचला. क्रूरतेचा कळस म्हणजे या वादात महिलेची जीभच छाटण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना अयोध्येतील आशापूर सरैया गावात घडली आहे. सार्वजनिक जागेच्या साफसफाईवरून वाद झाला. या वादावरून एका महिलेला बेदम मारहाण करत तिची जीभ कापली आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकाला अटक करण्यात आली आणि एक फरार आहे.गोसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत आशापूर सरैया गावातील सुनिता वर्मा आपल्या घरासमोर धान्य ठेवण्यासाठी जागेची साफसफाई करत होती. त्यावेळी गावातीलच अर्जुन नावाच्या व्यक्तीने तिला साफसफाई करण्यास मनाई केली. मात्र, सुनिताने न जुमानता काम सुरूच ठेवलं. त्यामुळे त्याने आणि त्याच्या कुटुंबाने सुनिताला मारहाण केली. एवढ्यावरच हा वाद थांबला नाही तर तिचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.तिच्या गळ्यावर पाय ठेवल्यानंतर सुनिताची जीभ बाहेर आली. त्यावेळी तिची जीभ त्यांनी कापून टाकली.जीभ छाटल्याने तडफडणारी सुनिता ओरडू लागली. तिचा आरडाओरडा ऐकून गावातील इतर लोक धावत आले आणि त्यांनी सुनिताचा जीव वाचवला. गोसाईगंजमधील आरोग्य केंद्रात तिच्यावर  प्राथमिक उपचार करून तिला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. पीडितेचा पती रामप्यारे वर्माने पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि पत्नीला मारहाण करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीने अर्जुन आणि चंद्रकात नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार दिलेली आहे. त्यांच्याविरोधात भादंवि कलम 326 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे, तर दुसरा आरोपी फरार आहे. पोलीस पुढील तपास करत आहे, अशी माहिती न्यूज १८ हिंदीने दिली आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकAyodhyaअयोध्याWomenमहिला