शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

प्रतिबंधित औषधे विकणाऱ्या कॉल सेंटरचा पर्दाफाश, दोघांना क्राइम ब्रांचकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 3:57 AM

कॉल सेंटरचा वापर करत विदेशात प्रतिबंधीत औषधांची विक्री करण्यात येत होती.

मुंबई : कॉल सेंटरचा वापर करत विदेशात प्रतिबंधीत औषधांची विक्री करण्यात येत होती. याप्रकरणी टोळीचा पदार्फाश करत दोघांच्या मुसक्या क्राईम ब्रांचच्या कक्ष १० ने सोमवारी आवळल्या. मुदस्सर मकानदार (३४) आणि अशले डिसूझा (३८) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असुन ते अनुक्रमे चांदीवली आणि अंधेरीचे राहणारे आहेत.अंधेरीच्या मरोळ परिसरात ए एम एम नामक बोगस कॉलसेंटर चालविले जात आहे. तसेच यामार्फत अमेरिकेतील नागरिकांना प्रतिबंधित औषधांची विक्री केली जात आहे, अशी माहिती कक्ष १० चे प्रमुख सुनील माने यांना मिळाली. त्यानुसार १७ जानेवारी रोजी त्यांच्या पथकाने या कॉलसेंटरवर धाड टाकली.त्यावेळी जवळपास वीस जण कानाला मायक्रोफोन लावुन एक स्क्रिप्ट वाचुन दाखवून लोकांना व्हायग्रा, लिवेट्रो, ट्रामाडोल, प्रोपेसीया, सोमा, अमॉक्सिलिन सारखी औषधे विकत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी असलेले संगणक, राउटर, सर्व्हर कनेकटर तसेच अन्य सामग्री ताब्यात घेत दोघांना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई