Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 12:42 IST2025-05-06T12:38:50+5:302025-05-06T12:42:11+5:30

Teacher and Student Love Relationship: एका खासगी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाचे शाळेतील १४ वर्षाच्या विद्यार्थीसोबत प्रेमसंबंध होते. याबद्दल दोघांच्याही घरी कळलं होतं. पण तरीही दोघे भेटतच होते.

Crime: 24-year-old teacher, 14-year-old student; booked a room in OYO hotel and a terrible thing happened | Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर

Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर

Teacher Student Crime News: काही दिवसांपूर्वी एक बातमी चर्चेचा विषय ठरली होती, २३ वर्षांची शिक्षिका १३ वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत पळून गेल्याची! पळून गेलेली शिक्षिका त्या मुलाची आई होणार असल्याचेही समोर आले. गुजरातमधील या घटनेप्रमाणेच आणखी एक घटना समोर आलीये, पण इथे शिक्षकाचेविद्यार्थीनीसोबत प्रेमसंबंध होते. ही घटना आहे उत्तर प्रदेशातील अलीगढची. २४ वर्षीय शिक्षकाचे शाळेतीलच १४ वर्षाच्या विद्यार्थीनीसोबत प्रेमसंबंध जुळले आणि भयंकर शेवट झाला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

२४ वर्षाचा शिक्षक ज्या खासगी शाळेत शिकवत होता, त्याच शाळेतील १४ वर्षाच्या मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. गेल्या काही महिन्यांपासून ते एकमेकांना भेटतही होते. हे प्रकरण त्यांच्या घरच्यांपर्यंत पोहचले होते. 

शिक्षकाचे आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर जडलं प्रेम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व्यक्ती हा ज्वालाजीपुरमचा रहिवासी होता. तो एका खासगी शाळेत शिक्षक होता. तर विद्यार्थीनी त्याच शाळेतील आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. दोघांमध्ये मागील बऱ्याच महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. 

शाळेतच दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर विद्यार्थीनी शिक्षकाकडे ट्यूशन क्लासलाही जाऊ लागली. त्यामुळे दोघांमध्ये जवळीकता वाढली होती. 

दोघांच्या प्रेमसंबंधाबद्दल कुटुंबीयांना कळलं

शिक्षक आणि विद्यार्थीनीच्या घरी याबद्दल कळलं. तीन महिन्यांपूर्वी कुटुंबीयांना कळल्यानंतर विद्यार्थीनीचे ट्यूशन बंद करण्यात आले. शाळेतही ती शिक्षकाला भेटणार नाही, याची काळजी घेतली गेली. पण, कुटुंबीयांची नजर चुकवून ते दोघेही भेटत होते. त्या दोघांनाही समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते ऐकायलाच तयार नव्हते, असे कुटुंबीयांनीही सांगितले. 

दोघांनी ओयो हॉटेलमध्ये रूम बुक केली अन्...

सोमवारी म्हणजे ५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता पोलिसांच्या ११२ या नंबर एक कॉल आला. खेरेश्वर पोलीस चौकीजवळ असलेल्या एका ओयो हॉटेलच्या रूम नंबर २०४ मध्ये एका तरुणाचा आणि एका युवतीचा मृतदेह आढळून आला आहे. 

वाचा >>हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रूमची पाहणी केली. दोघेही निष्प्राण अवस्थेत पडलेले होते आणि रूममध्ये एक विषारी द्रव पदार्थ असलेली रिकामी बॉटल पडलेली होती. 

पोलिसांनी चौकशी केली, त्यातून अशी माहिती समोर आली की, विद्यार्थीनी सकाळी शाळेत जाण्यासाठी निघाली. शाळेत पोहचल्यानंतर शिक्षक तिला हॉटेलवर घेऊन गेला. सकाळी ८.४० वाजेपासून ते हॉटेलमधील रूमध्ये होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दोघांच्या आईवडिलांनी हॉटेल परिसरात आक्रोश केला.

Web Title: Crime: 24-year-old teacher, 14-year-old student; booked a room in OYO hotel and a terrible thing happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.