Coronavirus: धक्कादायक! होम क्वारंटाईन होण्यावरुन वाद; लातूर जिल्ह्यात दोघांचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 07:59 AM2020-05-24T07:59:07+5:302020-05-24T08:11:35+5:30

क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिल्याने झाला वाद,

Coronavirus: Disputes over being home quarantine; Murder of two in Latur district | Coronavirus: धक्कादायक! होम क्वारंटाईन होण्यावरुन वाद; लातूर जिल्ह्यात दोघांचा खून

Coronavirus: धक्कादायक! होम क्वारंटाईन होण्यावरुन वाद; लातूर जिल्ह्यात दोघांचा खून

Next

निलंगा : नेहमी मुंबईला राहणारा व नुकताच गुजरातहून ट्रक घेऊन आलेल्या एकास होम क्वारंटाईन व्हावे, असे सांगितल्याने वाद झाला. त्यात नातेवाईकांत तुंबळ हाणामारी होऊन दोघांचा खून झाला. ही घटना निलंगा तालुक्यातील बोळेगाव येथे रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडली.

यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी सांगितले, विद्यमान बरमदे हा नेहमी मुंबईला वास्तव्याला असतो. तो ट्रॅक घेऊन गुजरातहून  आला अशी माहिती कळल्याने बोळेगावातील (ता. निलंगा) पुढाकार घेणारे शत्रुघ्न पाटील यांनी विद्यमान बरमदे यास होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला, त्यावरुन बरमदे व पाटील यांच्यात वाद झाला. दरम्यान बरमदे यांची बहीण शेजारील चांदोरी गावात राहते. तो तिथे गेला. नंतर पहाटे बोळेगावात आल्यावर हाणामारी झाली असून त्यात फिर्यादी शत्रूघ्न पाटील यांचे वडील शहाजी पाटील व त्यांचा पुतण्या वैभव पाटील ठार झाले. तर शत्रुघ्न पाटील गंभीर जखमी झाले, अशी प्राथमिक माहिती आहे असे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. माने म्हणाले. सदर घटनेत विद्यमान बरमदे यासह सहाजण आरोपी असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे  कासारशिरसी पोलिसांनी सांगितले.

Web Title: Coronavirus: Disputes over being home quarantine; Murder of two in Latur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.