काँग्रेस आमदाराची डॉक्टरसोबत दादागिरी; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला पोलिसांसमोर मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 04:59 PM2021-05-10T16:59:12+5:302021-05-10T17:02:54+5:30

Congress MLA threatens to kill district health officer : आरोग्य अधिकाऱ्यांचा कामबंदचा इशारा : दोषी आमदारावर गुन्हा नोंदवून अटक करा

Congress MLA threatens to kill district health officer in front of police | काँग्रेस आमदाराची डॉक्टरसोबत दादागिरी; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला पोलिसांसमोर मारण्याची धमकी

काँग्रेस आमदाराची डॉक्टरसोबत दादागिरी; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला पोलिसांसमोर मारण्याची धमकी

Next
ठळक मुद्देकाँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना अश्लिल शिवीगाळ करून थेट पोलिसांसमोरच मारण्याची धमकी भ्रमणध्वनीवर दिली. आ. कांबळे यांच्याविरुद्ध कलम २९४, ३५३, ५०६, ३३२, ३३३, १८८, ५०४, ६५ (ब.) तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी.

वर्धा : देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्रात आमदाराला कुठलीही विचारणा न करता थेट कोविड चाचणी शिबीर घेतल्याचा ठपका ठेवत काँग्रेसचेआमदाररणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना अश्लिल शिवीगाळ करून थेट पोलिसांसमोरच मारण्याची धमकी भ्रमणध्वनीवर दिली. कोविड संकटाच्या काळातील हा प्रकार निंदनिय असून दोषी आमदारावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अन्यथा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.


प्रत्येक कोविड बाधिताला चांगली आरोग्य सेवा देण्यासह कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. नवीन कोविड बाधित वेळीच ट्रेस करून त्यांना चांगली आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने देवळी तालुक्यातील एका गावात कोविड चाचणी शिबीर लावण्यात आले होते. आमदाराला विचारणा न करता थेट कोविड चाचणी शिबीर लावल्याचे कारण पुढे करीत पुलगाव-देवळी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी डीएचओ डॉ. अजय डवले यांच्याशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांना अश्लिल शिवीगाळ करून थेट बड्या पोलीस अधिकाऱ्यांसमोर मारण्याची धमकी दिली.

आ. रणजित कांबळे याचा हा प्रकार कोविड संकटाच्या काळात २४ तास सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करणारा असून तो निंदनिय आहे. यामुळे आ. कांबळे यांच्याविरुद्ध कलम २९४, ३५३, ५०६, ३३२, ३३३, १८८, ५०४, ६५ (ब.) तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी. मंगळवारी सकाळी ९ वाजेपर्यंत दोषी आमदाराविरुद्ध कारवाई न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना दिलेल्या निवदेनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेचे पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते.

Web Title: Congress MLA threatens to kill district health officer in front of police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.