गेल्या वर्षाच्या तुलनेत नागपुरात गुन्हेगारीत ३० टक्क्यांनी घट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 03:49 PM2020-06-18T15:49:51+5:302020-06-18T15:51:32+5:30

गेल्यावर्षी नागपुरात एक १ जानेवारी ते १७ जूनपर्यंत सर्व प्रकारचे एकूण ३७८७ गुन्हे घडले होते.

Compared to last year, crime in Nagpur has dropped by 30 per cent | गेल्या वर्षाच्या तुलनेत नागपुरात गुन्हेगारीत ३० टक्क्यांनी घट

गेल्या वर्षाच्या तुलनेत नागपुरात गुन्हेगारीत ३० टक्क्यांनी घट

Next
ठळक मुद्देयावर्षी १७ जून पर्यंत नागपुरात ४० खून, ४३ खुनाचे प्रयत्न, ७ दरोडे, ४ चेणस्नेचिंग, ४० जबरी चोऱ्या, २६४ घरफोड्या, ६९ बलात्कार आणि १३३ अपहरण-पळवून नेण्याचे गुन्हे घडले. यावर्षी १७ जूनपर्यंत सर्व प्रकारचे एकूण २६६७ गुन्हे घडले आहे.लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून गेल्या दोन आठवड्यात खुनासारख्या गंभीर घटना सारख्या घडत असल्याने नागपुरात गुन्हेगारी वाढल्याची ओरड होत आहे.

नागपूर : १ जानेवारी ते १७ जून २०१९ आणि १ जानेवारी ते १७ जून २०२० या कालावधीतील तुलनात्मक गंभीर गुन्हे बघितले असता यावर्षी गुन्हे रोखण्यात पोलिसांनी बर्‍यापैकी यश मिळवल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.


गेल्यावर्षी नागपुरात एक १ जानेवारी ते १७ जूनपर्यंत सर्व प्रकारचे एकूण ३७८७ गुन्हे घडले होते. त्यात ५० खून, ४१ खुनाचे प्रयत्न, १० दरोडे, ३६ चेनस्नेचिंग, ११२ जबरी चोरी, ३८६ घरफोड्या, ८० बलात्कार आणि २४१ अपहरण-पळवून नेण्याच्या गुन्ह्यांचा सामावेश होता.


यावर्षी १७ जून पर्यंत नागपुरात ४० खून, ४३ खुनाचे प्रयत्न, ७ दरोडे, ४ चेणस्नेचिंग, ४० जबरी चोऱ्या, २६४ घरफोड्या, ६९ बलात्कार आणि १३३ अपहरण-पळवून नेण्याचे गुन्हे घडले. यावर्षी १७ जूनपर्यंत सर्व प्रकारचे एकूण २६६७ गुन्हे घडले आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत आज पर्यंतच्या कालावधीत ११२० गुन्हे कमी घडले असून गुन्हेगारीत ३० टक्के घट झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
 


झपाट्याने वाढत आहे लोकसंख्या
नागपुरची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. नोकरदार आणि कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात नागपुरात दाखल होत असतानाच काही परप्रांतीय गुन्हेगारांचाही नागपुरात शिरकाव होत आहे. या तुलनेत लोकसंख्या वाढत असताना पोलिसांनी विविध उपाय योजना आखल्यामुळे गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे.

हे आहे प्रमुख कारण
लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून गेल्या दोन आठवड्यात खुनासारख्या गंभीर घटना सारख्या घडत असल्याने नागपुरात गुन्हेगारी वाढल्याची ओरड होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कारागृहातील कैद्यांना होऊ नये म्हणून सरकारने सात वर्षे शिक्षा असलेल्या गुन्ह्यातील बंदिवान कारागृहातून जामिनावर सोडले आणि तेव्हापासून गुन्हेगारी वाढली. मोकाट सुटलेल्या गुन्हेगारांनी हैदोस घालणे सुरू केल्याचे चित्र आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना  

 

Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली

 

रक्षक बनले भक्षक! गुंगीचे औषध देऊन पोलिसाने केला अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

 

बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश

 

भाजपा नेत्या, TIKTOK स्टार सोनाली फोगाट यांना अटक

 

बाप की नरपिशाच्च? लॉकडाऊनमध्ये पोटच्या मुलीवर बलात्कार करून द्यायचा गर्भपाताचे औषध

Web Title: Compared to last year, crime in Nagpur has dropped by 30 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.