शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

ड्र्ग्स केसप्रकरणी कॉमेडियन भारती सिंह पाठोपाठ तिच्या पतीलाही अटक

By बाळकृष्ण परब | Updated: November 22, 2020 08:45 IST

Mumbar Crime News : भारती सिंहवरील कारवाईनंतर तिचा पती हर्ष लिम्बाचिया याच्यावरही एनसीबीने अटकेची कारवाई केली आहे. दरम्यान, आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देएनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष याने ड्रग्स घेतल्याचे कबूल केल्याचे सांगण्यात येत आहेबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात कॉमेडियन भारती सिंगच्या मुंबईच्या घरी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) छापा टाकला होताया कारवाईत तिच्या घरात गांजा सापडला होता. त्यानंतर भारती आणि तिच्या पतीला एनसीबीने चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या ड्रग्स केस प्रकरणामध्ये शनिवारी एनसीबीने मोठी कारवाई केली. या कारवाईत कॉमेडियन भारती सिंह हिच्या घराच्या घेतलेल्या झडतीत गांजा सापडल्यानंतर एनसीबीने भारतीला अटक केली आहे. तसेच तिच्यावरील कारवाईनंतर तिचा पती हर्ष लिम्बाचिया याच्यावरही एनसीबीने अटकेची कारवाई केली आहे. दरम्यान, आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष याने ड्रग्स घेतल्याचे कबूल केल्याचे सांगण्यात येत आहे. बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात कॉमेडियन भारती सिंगच्या मुंबईच्या घरी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) छापा टाकला होता आणि या कारवाईत तिच्या घरात गांजा सापडला होता. त्यानंतर भारती आणि तिच्या पतीला एनसीबीने चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते.

या चौकशीनंतर भारती सिंह हिला अटक करण्यात आली होती. तर काही वेळाने तिच्या पतीलाही अटक करण्यात आली. भारती आणि हर्षच्या नोकरांकडेही चौकशी करण्यात आली. दरम्यान, अटकेनंतर दोघांनाही रात्रभर एनसीबीच्या कार्यालयात ठेवण्यात आले. अटकेत असलेल्या भारतीला भेटण्याची तिची आई आली होती. मात्र तिला भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली. आता आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल.अटकेत असलेल्या ड्रग्स पॅडलरकडून मिळाल्या माहितीनुसार भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाच्या घरी छापा टाकण्यात आला होता. बॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत बऱ्याच सेलिब्रेटींची नाव समोर आली आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीपासून दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यापासून ते अर्जून रामपाल पर्यंत अनेकांची चौकशी झाली. अजूनही एनसीबीची ही करावाई सुरु आहे. 

 

टॅग्स :Drugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई