शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

नदीत आंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; दोन अल्पवयीन मुलींचा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 14:39 IST

नदीत अंघोळ करणाऱ्या मुलींचे व्हिडीओ काढणाऱ्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

UP Crime: यमुना नदीच्या पात्रात स्नान करत असताना काही तरुणांनी चोरून व्हिडिओ काढल्याच्या धक्क्यातून दोन किशोरवयीन मुलींनी विष पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. चित्रकूट जिल्ह्यातील पहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, १६ आणि १७ वर्षीय दोन मैत्रिणी गुरुवारी यमुना नदीत आंघोळीसाठी गेल्या होत्या. त्याच वेळी तिथे दबा धरून बसलेल्या काही नराधमांनी या मुलींचे मोबाईलवर व्हिडिओ बनवले आणि फोटो काढले. ही बाब मुलींच्या लक्षात आली आणि परिसरात याची चर्चा झाली. या घटनेची माहिती मिळताच मुलींच्या कुटुंबीय त्यांच्यावर घरी आल्यावर प्रचंड ओरडले दिला आणि रागावले.

नदीवर काढलेले व्हिडीओ व्हायरल होतील आणि घरातून ओरडा बसल्यामुळे या दोन्ही मुली प्रचंड मानसिक दडपणाखाली आल्या. यातून त्यांनी शुक्रवारी विष प्राशन करून टोकाचे पाऊल उचलले.

प्रकृती चिंताजनक; उपचार सुरू

विष प्यायल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने स्थानिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आधी जिल्हा रुग्णालय आणि त्यानंतर बांदा येथील राणी दुर्गावती मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे. सध्या या दोन्ही मुली मृत्यूशी झुंज देत असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांच्या तीन टीमकडून तपास सुरू

चित्रकूटचे पोलीस अधीक्षक अरुण कुमार सिंह यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तपासासाठी तीन स्वतंत्र पथके तैनात केली आहेत.

'व्हिडिओ' बनवणाऱ्या नराधमांचा शोध जारी

या घटनेमुळे उत्तर प्रदेशात महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांचे असे चोरून व्हिडीओ काढणे आणि त्यांना मानसिक त्रास देणे अशा गुन्ह्यातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे. मुलींनी दिलेल्या माहितीत आरोपींनी व्हिडिओ काढल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. पोलीस आता आरोपींची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Teens attempt suicide after bath video threat in Uttar Pradesh

Web Summary : Two Uttar Pradesh teens tried suicide after men filmed them bathing, threatening to release the video. Facing family pressure, they consumed poison and are critically ill; police investigate.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश