शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात १३० ठिकाणी गुरे चोरणारी चार जणांची टोळी अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 23:13 IST

चाळीसगाव तालुक्यात सातत्याने होणार्‍या पशुधन चोरीनंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी २४ नोव्हेंबर रोजी नाकाबंदी केली होती.

चाळीसगाव जि. जळगाव  : जळगावसह राज्यभरातील १३०  ठिकाणी गुरांची चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीस चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी  जळगाव, चाळीसगाव, अमळनेर, पाचोरा, पारोळा, भडगाव त्याप्रमाणे नाशिक, औरंगाबाद, धुळे जिल्ह्यातही गुरे चोरीची कबुली दिली आहे. त्यांच्या ताब्यातून आतापर्यंत ३३ गुरे  आणि गुन्ह्यात वापरलेली वाहनेदेखील जप्त करण्यात आली आहेत.

सलीम मोहंमद शरीफ (रा.हुडको कॉलनी,मालेगाव), मन्नान शेख जब्बाद शेख (रा.मालदा शिवार,मालेगाव), फौजान शेख फारुख (रा.वीस फुटी रोड,मालेगाव) आणि सलमान खान दस्तगीर खान (रा.मदरसा शाळेजवळ, मालेगाव) अशी या आरोपींची नावे आहेत. 
चाळीसगाव तालुक्यात सातत्याने होणार्‍या पशुधन चोरीनंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी २४ नोव्हेंबर रोजी नाकाबंदी केली होती. यात रोहिणी गावाजवळील एका हॉटेलजवळ गुरे चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली होती. या टोळीची सखोल चौकशी केल्यानंतर राज्यभरात या टोळीने धुमाकूळ घातल्याचे उघड झाले होते. 

चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील नऊ, मेहुणबारे हद्दीतील तीन व चाळीसगाव शहर पोलिस ठाणे हद्दीतील दोन ठिकाणाहून आरोपींनी गुरांची चोरी केल्याचे तपासात उघड झाले तसेच नाशिक, धुळे व औरंगाबाद भागातील २० ठिकाणावरून आरोपींनी गुरे चोरुन नेले होते. 

संशयितांनी विविध ठिकाणाहून चोरलेली एकूण ३३ गुरांची विक्री मालेगाव येथे केली होती. त्यात सात मोठ्या गायी, आठ कालवडी, १२ गोर्‍हे, सहा वासरांचा समावेश आहे.  तसेच गुन्ह्यातील वाहन (क्र.एम.एच.03 सी.बी.५२३१) व दुचाकी (एम.एच.४१ ए.एच.२६९४) जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, अटकेतील आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.