शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! सख्या भावानेच अंगावर पेट्रोल टाकून पेटवले; बारामती तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 19:53 IST

७० टक्के भाजल्याने मारुती यांचा ससुन रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी झाला मृत्यू

ठळक मुद्दे याप्रकरणी पोलिसांनी केला आरोपीवर गुन्हा दाखल

सुपे : बारामती तालुक्यातील काळखैरेवाडी अंतर्गत असणाऱ्या राजबाग येथे सख्या भावानेच भावावर पेट्रोल टाकुन पेटवुन दिल्याची घटना बुधवारी ( दि.१२ ) रात्री साडेआकराच्या सुमारास घडली.घरातुन वेगळे राहण्याच्या वादातुन हा प्रकार घडला असुन यामध्ये मारुती वसंत भोंडवे ७० टक्के भाजल्याने ससुनमध्ये उपचार घेत असताना शुक्रवारी ( दि.१४ ) दुपारी मृत्यु झाला.        याप्रकरणी पोलिसांनी अनिल वसंत भोंडवे ( वय ३२ रा. राजबाग ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तो फरारी असल्याची माहिती पोलिस हवालदार भाऊसाहेब शेंडगे यांनी दिली.        पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  काळखैरेवाडी अंतर्गत असणाऱ्या राजबाग येथे  बुधवारी ( दि. १२ ) रात्री राहत्या घरी मारुती, त्याची पत्नी सविता आणि मुलगा महेश व हर्षद हे सर्वजण झोपले होते. यावेळी घरातुन वेगळे राहण्याच्या वादातून धाकट्या भावाने ( अनिल ) घराची कडी बाहेरुन लावुन खिडकीच्या काचा फोडुन थोरल्या भावाच्या ( मारुती ) अंगावर पेट्रोल ओतून पेटवुन देण्याचा प्रकार घडला. यावेळी मारुती याची पत्नी आग विझवण्याकरीता पुढे आली मात्र त्याही यामध्ये भाजल्या गेल्या. यावेळी तिने आरडाओरडा करुन शेजाऱ्यांना बोलवण्यात आले.      

त्यामुळे मारुती यास उपचारासाठी ससुन येथे दाखल करण्यात आले होते. यावेळी पुणे येथील ससुन रुग्णालयात गुरूवारी ( दि. १३ ) पोलिसांनी मारुती यांचा जबाब नोंदवला. मात्र ७० टक्के भाजल्याने मारुती याचा उपचारादरम्यान शुक्रवारी ( दि. १४ ) दुपारी मृत्यु झाला. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे  करीत आहेत. दरम्यान बारामतीचे विभागिय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी घटनास्थळी भेट देवुन पहाणी केली.      ...........................................

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू