नग्न अवस्थेत सापडला अल्पवयीन मुलीचा मृतदेह; बलात्कारानंतर हत्या केल्याची पोलिसांना संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 21:36 IST2021-12-24T21:36:07+5:302021-12-24T21:36:44+5:30
Dead Body Found :प्रथमदर्शनी असे दिसते की, मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

नग्न अवस्थेत सापडला अल्पवयीन मुलीचा मृतदेह; बलात्कारानंतर हत्या केल्याची पोलिसांना संशय
राजस्थानमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. एका अल्पवयीनासह दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, असे बुंदीचे पोलीस अधीक्षक जय यादव यांनी पीटीआयला सांगितले. तिसऱ्या आरोपीचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ते म्हणाले.
१५ वर्षीय आदिवासी मुलगी तिच्या दोन मैत्रिणींसोबत गुरुवारी दुपारी शेळ्या चरण्यासाठी बाहेर गेली होती. संध्याकाळी परत आल्यानंतर दोन्ही मुलींनी पीडितेच्या पालकांना सांगितले की, १५ वर्षीय मुलगीआराम करण्यासाठी मध्येच थांबली होती. मात्र, बराच वेळ ती न परतल्याने त्या दोघो पुढे निघून गेल्या. त्यानंतर मुलीचे पालक आणि नातेवाईकांनी शोध सुरू केला, त्यावेळी तिचा नग्न मृतदेह सापडला, असे पोलिसांनी सांगितले.
प्रथमदर्शनी असे दिसते की, मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दोन आरोपींवर भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या कलम 302 (हत्या), 201 (गुन्ह्याचे पुरावे गायब करणे) आणि 376 (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. शवविच्छेदनानंतर मुलीचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.