ज्याच्यासाठी पतीला सोडलं त्यानेच दिला दगा, प्रियकराच्या घरी जाऊन प्रेयसीने घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 15:59 IST2021-10-18T15:57:59+5:302021-10-18T15:59:29+5:30

जेव्हा राजनचं लग्न झालं तर कुसुमच्या परिवारानेही तिचं लग्न दुसऱ्या मुलासोबत लावून दिलं. लग्नानंतर राजनची पत्नी मनोरूग्ण निघाली.

Bihar : Siwan girl friend commits suicide at boyfriend house after dispute | ज्याच्यासाठी पतीला सोडलं त्यानेच दिला दगा, प्रियकराच्या घरी जाऊन प्रेयसीने घेतला गळफास

ज्याच्यासाठी पतीला सोडलं त्यानेच दिला दगा, प्रियकराच्या घरी जाऊन प्रेयसीने घेतला गळफास

बिहारच्या सीवानमध्ये प्रेमात आंधळ्या झालेल्या एका प्रेयसीने आपल्या प्रियकराच्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सीवानच्या रामनगरमधील आहे. मृत महिलेचं नाव कुसुम कुमारी असून ती रामनगरच्या महादलित वस्तीत राहत होती. असं सांगितलं जात आहे की, काही वर्षाआधी कुसुम कुमारी राजन नावाच्या तरूणाच्या प्रेमात पडली होती. पण ही बाब राजनच्या आईला माहीत नव्हती. त्यामुळे तिने मुलाचं लग्न दुसऱ्या मुलीसोबत लावून दिलं.

इकडे जेव्हा राजनचं लग्न झालं तर कुसुमच्या परिवारानेही तिचं लग्न दुसऱ्या मुलासोबत लावून दिलं. लग्नानंतर राजनची पत्नी मनोरूग्ण निघाली. ज्यामुळे गेल्या ३ वर्षांआधीच राजनने पत्नीला सोडलं होतं. जेव्हा राजनने पत्नीला सोडल्याी खबर कुसुमला लागली तिने तिचं सासर सोडलं आणि ती राजनसोबत लग्न करण्याचा हट्ट करू लागली.

कुसुम काही वर्षापासून राजनच्या घरी सकाळी येत होती आणि सायंकाळी जात होती. कुसुमला राजनसोब लग्न करायचं होतं. पण राजनला आता लग्न करायचं नव्हतं. रविवारी राजन आपल्या घरात झोपलेला होता आणि कुसुम नेहमीप्रमाणे त्याच्या घरी आली. तिने राजनच्या घरातील भांडीही घासली आणि यादरम्यान काही गोष्टीवरून दोघांमध्ये वाद झाला. अशात रागात कुसुमने गळफास घेऊन आत्महत्या केली.

कुसुमने आत्महत्या केल्याची सूचना मिळताच स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि चौकशी करू लागले. आता पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
 

Web Title: Bihar : Siwan girl friend commits suicide at boyfriend house after dispute