राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 15:48 IST2025-06-10T15:47:29+5:302025-06-10T15:48:10+5:30

राजा आणि सोनम हनीमूनसाठी मेघालयला गेले होते.  दोघांनीही ११ मे रोजी लग्न केले आणि २० मे रोजी हनीमूनसाठी निघाले

Big revelation in Raja Raghuvanshi murder case; Sonam Raghuvanshi reached Indore at 25 may after the murder | राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...

राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...

इंदूर - राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणी मोठा खुलासा समोर आला आहे. हत्येनंतर सोनम घटनास्थळापासून १० किमी दूर तिन्ही आरोपींसोबत बोलताना सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्यानंतर २५ तारखेला ती शिलांगहून सिलिगुडीमार्गे ट्रेनने इंदूरला पोहचली. इंदूरमध्ये राज सोनमला भेटला. सोनममध्ये इंदूरमध्येच भाड्याने खोली घेऊन राहिली होती. त्यानंतर एका ड्रायव्हरने तिला यूपीला पाठवले होते. वाराणसीहून ती गाजीपूरला पोहचली होती. गुवाहाटी रेल्वे स्टेशनजवळ हत्येत वापरलेले हत्यार सापडले आहे. हनीमूनवेळी सोनमने अनेक फोटो अपलोड केले नाहीत ज्यातून पोलिसांना संशय येईल हे तपासात पुढे आले आहे.

सोनमने केली होती पोस्ट

सोनमने पतीच्या हत्येनंतर त्याला दरीत कोसळताना पाहिले आणि त्याच्यात मोबाईलवरून २ वाजून १५ मिनिटांनी एक पोस्ट केली होती. ज्यात लिहिले होते की, सात जन्मो का साथ है...ही पोस्ट तिने राजा जिवंत आहे हे दाखवण्यासाठी केली होती. हत्येनंतरही राजाचे अकाऊंट सुरू होते. राजाची हत्या २३ मे रोजी झाली. त्याचदिवशी हे जोडपे गायब झाल्याचे समोर आले होते. दुपारी २.१५ मिनिटांनी ही पोस्ट अपलोड करण्यात आली होती.

विशालने केला होता राजावर वार

४ जूनच्या आसपास पोलिसांना राजाच्या हत्येत सोनमचा सहभाग असल्याची शंका आली. घटनास्थळी जे जॅकेट सापडले ते आरोपी आकाशचे होते. तिथेच सोनमचे रेनकोट मिळाले होते. मोबाईल स्क्रीन मिळाले ते राजाचे होते. सोनमने तिचे रेनकोट आकाशला दिले होते. ज्यावर रक्ताचे डाग लागले होते. आकाशने ते तिथेच फेकले. आनंदच्या अटकेवेळी त्याने तेच कपडे घातले होते. राजावर पहिला वार आरोपी विशालने केल्याचे कळतंय. 

रेनकोटनं उघडलं रहस्य

राजा आणि सोनम हनीमूनसाठी मेघालयला गेले होते.  दोघांनीही ११ मे रोजी लग्न केले आणि २० मे रोजी हनीमूनसाठी निघाले. ३ दिवसांनी २३ मे रोजी एका होम स्टेमधून चेकआऊट केल्यानंतर दोघे गायब झाले. त्यांनी भाड्याने घेतलेले वाहन एका गावात बेवारस अवस्थेत सापडले. अनेक दिवसांच्या तपासानंतर २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह खोल दरीत सापडला तर सोनम बेपत्ता होती. पोलिसांना एक चाकूही सापडला जो राजाच्या हत्येत वापरला होता. २ दिवसांनी पोलिसांनी एक रेनकोट सापडला जो खूप मोठा होता. त्यातून गायब झालेल्या पत्नीचा शोध घेणे सोपे झाले. 
 

Web Title: Big revelation in Raja Raghuvanshi murder case; Sonam Raghuvanshi reached Indore at 25 may after the murder