मोठी बातमी! अखेर रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडाला एनसीबीने केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 09:09 PM2020-09-04T21:09:06+5:302020-09-04T21:15:53+5:30

Sushant Singh Rajput Case : काही कायदेशीर बाबींची पूर्तता एनसीबीकडून केली जात आहे. 

Big news! Eventually, Rhea, Shovik and Miranda were arrested by the NCB | मोठी बातमी! अखेर रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडाला एनसीबीने केली अटक

मोठी बातमी! अखेर रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडाला एनसीबीने केली अटक

Next
ठळक मुद्दे याआधी ड्रग्ज कनेक्शन संबंधी कपिल झव्हेरी, अब्बास लखानी , फेयाज अहमद, परवेझ खान उर्फ चिकू पठाण, बासित परिहार, झेंद विलात्रा  व करण अरोरा अशी अटक केल्याची नावे आहेत.

मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या प्रकरणात ड्रग कनेक्शन उघडकीस आल्यानंतर चौकशीदरम्यान एनसीबी सतत कारवाई करत आहे. आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास रियाच्या सांताक्रुज येथील राहत्या घरी आणि सॅम्युअलच्या अंधेरी येथील घरावर एनसीबीने छापेमारी केली. यानंतर शोविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअलला एनसीबीच्या मुंबई कार्यालयात आणण्यात आले, जिथे त्यांची चौकशी केली जात आहे. यावेळी सॅम्युअल मिरांडा याने अधिकाऱ्यांना सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करत असल्याचे सांगितले. अखेर आता शोविक आणि मिरांडा यांना NDPS Act अंतर्गत एनसीबीकडून अटक केली गेली आहे. काही कायदेशीर बाबींची पूर्तता एनसीबीकडून करण्यात आली. सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील ही पहिलीच अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

याआधी ड्रग्ज कनेक्शन संबंधी कपिल झव्हेरी, अब्बास लखानी , फेयाज अहमद, परवेझ खान उर्फ चिकू पठाण, बासित परिहार, झेंद विलात्रा  व करण अरोरा अशी अटक केल्याची नावे आहेत. झव्हेरी व अब्बास यांना मंगळवारी पश्चिम उपनगरातील अड्डयावर छापे टाकून अटक केली होती. त्यानंतर बुधवारी इतरांना अटक करण्यात आली. हे सर्वजण बॉलिवूड आणि पेज र्थी पार्ट्यामध्ये अंमली पदार्थ पुरवित असल्याचा अधिकाऱ्यांचा कयास आहे.

Showik Chakraborty at NCB office. Pic/Bipin Kokate

गौरव आर्या हा  बासित परिहार याच्या संपर्कात होता. तो टॅक्सी ड्रायवरचे काम करतो, इच्छुक ठिकाणी त्याचबरोबर मालाची डिलिव्हरी करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविली जात होती.  रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शोविक हा ही या तस्कराच्या संपर्कात होता. त्याने एकाकडे वडिलांसाठी अंमली पदार्थाची मागणी केल्याचे व्हॉटस अप मेसेज समोर आले आहेत. त्यानुषंगाने त्याची, गौरव आर्या, रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजित यांच्याकडे एनसीबी चौकशी  करणार आहे.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल

 

महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात वाढ, सीआयडीचा क्राईम इन महाराष्ट्र २०१८ अहवाल जाहिर

Read in English

Web Title: Big news! Eventually, Rhea, Shovik and Miranda were arrested by the NCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.