बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 09:34 PM2020-09-03T21:34:22+5:302020-09-03T21:35:37+5:30

मंगळवारी जाहीर झालेल्या एनसीआरबीच्या अहवालानुसार "अपघाती मृत्यू आणि आत्महत्या 2019" , नुसार 2019 मध्ये सुमारे 1.39 लाख लोकांनी आत्महत्या केली, त्यापैकी 93,061 तरुण वयोगटातील होते.

More than 90,000 youths committed suicide in 2019, see NCRB report | बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल

बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल

googlenewsNext
ठळक मुद्देजर आपण याची तुलना 2018 च्या आकडेवारीशी केली तर एका वर्षात तरूणांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये 4% वाढ झाली आहे. 2018 मध्ये 89,407 तरुणांनी आत्महत्या केली.

2019 मध्ये 1.39 लाखाहून अधिक लोकांनी आत्महत्या केली. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालानुसार 2019 मध्ये झालेल्या आत्महत्येच्या प्रकरणात  67% घटना १ - ४५ वयोगटातील तरुणांच्या आहेत. मंगळवारी जाहीर झालेल्या एनसीआरबीच्या अहवालानुसार "अपघाती मृत्यू आणि आत्महत्या 2019" , नुसार 2019 मध्ये सुमारे 1.39 लाख लोकांनी आत्महत्या केली, त्यापैकी 93,061 तरुण वयोगटातील होते.

जर आपण याची तुलना 2018 च्या आकडेवारीशी केली तर एका वर्षात तरूणांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये 4% वाढ झाली आहे. 2018 मध्ये 89,407 तरुणांनी आत्महत्या केली. म्हणून आतापर्यंत सर्व वयोगटात आत्महत्या करण्याच्या घटना पाहिल्या, तर २०१९ मध्ये त्यामध्ये 4.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गळफास लावून घेणे ही आत्महत्येची सर्वात सामान्य पद्धत आहे. 2019 मध्ये, 74,629 लोक (53.6%) गळफासामुळे मरण पावले. बॉलिवूडचा सुपरस्टार सुशांत सिंग राजपूत यावर्षी 14 जून रोजी मुंबईतील वांद्रे येथील आपल्या अपार्टमेंटमध्ये गळफास घेऊन पंखेला लटकवताना आढळला होता. सुशांतचा मृत्यू आत्महत्या होता की नाही हे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल. पण त्यांच्या निधनाने संपूर्ण देश हादरला.

23 ऑगस्ट रोजी सीबीआयच्या पथकाने सुशांतच्या आत्महत्येचा नाट्यरूपांतर करून घटनेचा तपास सुरु केला. सुशांतच्या मृत्यूच्या चौकशीत जर हे उघड झाले की अभिनेत्याने गळफास लावून आत्महत्या केली तर त्याचे नावही यापूर्वी स्वतः मृत्यूला कवटाळलेल्या अनेक नामांकित लोकांच्या यादीत समाविष्ट होईल. यामध्ये अभिनेत्री जिया खानचा समावेश आहे, जो आपल्या घरात 2013 मध्ये लटकलेली आढळली होती.


आत्महत्येस प्रवृत्त करणारी करणे 


युवा आत्महत्यांचे मुख्य कारण म्हणजे कौटुंबिक कलह, प्रेमाचे विषय, मादक पदार्थांचे सेवन, मानसिक आजार असून ही आत्महत्येची कारणांची विस्तृत वयानुसार विश्लेषण करण्यात आले आहे. अहवालानुसार कौटुंबिक समस्या हे 18 वर्षांवरील आणि 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये आत्महत्या करण्याचे सर्वात मोठे कारण आहे.

2019 मध्ये एकूण 1.39 लाख आत्महत्येची नोंद झाली. यापैकी सुमारे 93,016 किंवा 67 टक्के तरुण लोक होते, ज्यांचे वय 18 ते 45 वर्षांदरम्यान आहे. यापैकी 31,725 (34 टक्के) कौटुंबिक समस्यांमुळे आत्महत्या झाल्या. 7,293 म्हणजेच 7.3 टक्के लोकांनी लग्नाशी संबंधित मुद्द्यांमुळे आत्महत्या केली.

6,491 म्हणजेच सात टक्के लोकांनी मानसिक आजारामुळे आत्महत्या केली आहे.  5,297 (5.6 टक्के) लोकांनी ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या व्यसनामुळे आत्महत्या केली, तर 4,919 (5.2 टक्के) लोकांनी प्रेम संबंधातून आपले आयुष्य संपवले.


हे लक्षात घेण्यासारखे आहे की कौटुंबिक समस्या आणि मानसिक आजारांमुळे आत्महत्या केलेल्या पुरुषांची संख्या खूप जास्त आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार मानसिक आजारांमुळे आत्महत्या केलेल्यांमध्ये 71 टक्के पुरुष होते. त्याचप्रमाणे कौटुंबिक समस्यांमुळे आत्महत्या केलेल्यांमध्ये 64 टक्के, प्रेम प्रकरणातून आत्महत्या केलेल्यांपैकी 62 टक्के आणि अंमली पदार्थ आणि दारूच्या व्यसनामुळे आत्महत्या केलेल्यांमध्ये 98 टक्के पुरुष होते.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक

 

आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा  

 

सकाळी बढती अन् सायंकाळी सेवानिवृत्ती, सीताराम बिश्नोई बनले एका दिवसासाठी इन्स्पेक्टर

 

ईडीकडून सुशांतचा भागीदार वरूण माथूरची चौकशी, गौरव आर्याचे मोबाईल जप्त

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

 

मथुरेत परदेशी तरुणीवर पाकिस्तानी युवकाकडून बलात्कार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Web Title: More than 90,000 youths committed suicide in 2019, see NCRB report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.