The mother made a deal for a virgin girl to have sex and made a deal of lakha of rupees | आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा  

आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा  

ठळक मुद्देती मिरा रोड येथे राहणारी असून  तिच्या मुलीला बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे. बनावट ग्राहकाद्वारे पोलिसांनी या प्रकरणाचा भांडाफोड केला आहे. तिच्याविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई : पोटच्या मुलीसोबत प्रथमच शरीसंबंध करण्यासाठी बोली लावून सौदा करणाऱ्या आईला नवी मुंबईपोलिसांनीअटक केली आहे. ती मिरा रोड येथे राहणारी असून  तिच्या मुलीला बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे. बनावट ग्राहकाद्वारे पोलिसांनी या प्रकरणाचा भांडाफोड केला आहे.

मिरा रोड येथील एक महिला स्वतःची मुलगी व्हर्जिन असून तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी ग्राहकाच्या शोधात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अर्जुन गरड यांना मिळाली होती. यानुसार गुन्हे शाखा उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहायक आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गरड यांनी बनावट ग्राहक तयार केले होते. या ग्राहकामार्फत सदर महिलेला संपर्क साधला असता तिने 18 वर्षीय व्हर्जिन मुलीसोबत संबंधासाठी दिड लाख रुपयांची बोली लावली. अखेर तडजोड करून 1 लाख 20 हजार रुपयांवर सौदा करण्यात आला. त्यानुसार सोमवारी हि महिला स्वतःच्या मुलीला घेऊन नवी मुंबईत आली होती. यावेळी शिरवणे येथील कोहिनुर पॅलेस हॉटेल मधील खोलीत ग्राहकासोबत सदर मुलीला पाठवले असता गरड यांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी मुलीच्या आईला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. तिच्याविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुलीला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी नेरुळ पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक

Web Title: The mother made a deal for a virgin girl to have sex and made a deal of lakha of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.