शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूर प्रकरण :आराेपी अक्षय शिंदे याच्या पोलिस कोठडीत वाढ

By मुरलीधर भवार | Updated: September 5, 2024 16:42 IST

आणखीन तीन दिवस पोलिस कोठडी

कल्याण-बदलापूर येथील शिशू वर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर लैगिंक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंंदे याला आज पुन्हा कल्याम जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत वाढ केली आहे. त्याला आणखीन तीन दिवसांची पोलिस काेठडी सुनावली आहे. ८ सप्टेंबरपर्यंत त्याची पोलिस कोठडी असून त्याला पुन्हा तीन दिवसांची न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

सरकारी वकील अश्वीनी भामरे पाटील यांनी सांगितले की, पोलिसांना तपास कामी आरोपी अक्षय शिंदे याचा मोबाईल हस्तगत करायचा आहे. त्याच्या मोबाईल विषयी माहिती देण्यास तो पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे देत आहे. त्याच्याकडून अद्याप त्याच्या मोबाईल विषयीची माहिती पोलिसांना देण्यात आलेली नाही. या शिवाय काही पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रारी केल्या होत्या. व्यवस्थापनातील दोन जणच आरोपीअसल्याने पुढील तपासकरीता क्लू मिळत नाही. त्यामुळे पोलिस कोठडीत वाढवून द्यावी अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती. न्यायालयाने या मागणीचा विचार करीत तपासाकरीता पोलिस कोठडी वाढवून दिली आहे. शिशू वर्गात शिकणाऱ््या दोन चिमुकल्या मुलींवरील लैगिंक अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे याला अटक करण्यात आल्यावर त्याला प्रथम २६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मिळाली होती. त्यानंतर त्याला २६ ऑगस्ट रोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली. ही कोठडी एका मुलीच्या गुन्ह्या प्रकरणी देण्यात आली होती. दुसऱ्या मुलीच्या लैगिंक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यावर आरोपी अक्षय शिंदेला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असात त्याला न्यायालयीन कोठडी दिली गेली होती. यावेळी पोलिसांनी तपासकामी पुन्हा पोलिस कोठडी घेण्याचा हक्क राखून ठेवला होता. त्यानुसार आरोपी अक्षय शिंदेला पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. ही पोलिस कोठडी संपुष्टात आल्यावर त्याला आज परत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत तीन दिवसाची वाढ केली आहे. आरोपी अक्षय शिंदे हा त्याच्या मोबाईलची माहिती पोलिसाना देत नाही. तर त्याचा मोबाईल नेमका कुठे आहे. तो कोणाकडे आहे. आरोपीने त्याच्या मोबाईलची विल्हेवाट लावली आहे का ? या विविध अंगाने एसआयटी आणि पोलिसांकडून तपास सुरु आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी